मौजे दस्तगीरवाडी ते पोखरी मंजूर रस्ता काम तात्काळ सुरू करा.५९ शेतकऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन ; आमरण उपोषणाचा इशारा*
(अंबाजोगाई / प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे दस्तगीरवाडी ते पोखरी मंजूर रस्ता काम भूमिपूजन झाले त्याला ही आता तब्बल ७ महिन्यांचा कालावधी होत आला आहे. तरी देखील हे काम सुरू झाले नाही. सदरील रस्ता या भागातील वाहतूक आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. त्यामुळे सदरील मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अशी मागणी या परीसरातील ५९ शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना बुधवार, दिनांक २ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील मौजे दस्तगीरवाडी ते पोखरी मंजूर रस्ता काम सुधारणा करणे ग्रा.मा.८१ ता.अंबाजोगाई जि.बीड, प्रशासकीय मान्यता : महाराष्ट्र शासन निर्णय बीपीएलएन सी.आर.२०४७ नि.३ दि.२१/२/२०२३. या प्रशासकीय कामाची किंमत १ कोटी रूपये आहे. ज्याचा कार्यारंभ दिनांक ०४/०७/२०२४ पीडब्ल्यूडी/अंबा./टेंडर ३९ असा आहे. सदरील कामाचे भूमिपूजन केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते दिनांक १७/०८/२०२४ रोजी करण्यात आले. भूमिपूजन झाले त्याला ही आता तब्बल ७ महिन्यांचा कालावधी होत आला आहे. तरी देखील हे काम सुरू झाले नाही. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. अनेक वेळा संबंधित यंत्रणेला सांगून सुद्धा हे काम सुरू करीत नाहीत. म्हणून नाविलाजास्तव ५९ शेतकऱ्यांनी बुधवारी कार्यकारी अभियंता, अंबाजोगाई यांना सदर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात हे काम तात्काळ सुरू केले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनाच्या प्रती आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा, जिल्हाधिकारी बीड, अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई आणि तहसीलदार अंबाजोगाई यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.