अंबाजोगाई

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार 

घाटनांदूर प्रतिनिधी  : तळणी (ता.अंबाजोगाई) येथील शेतकरी शेतातून म्हैस घेऊन गावाकडे जात असताना घाटनांदूरकडून अंबाजोगाईकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना (ता.७) सोमवारी सायंकाळी घडली आहे.

अशोक व्यंकट गित्ते (वय ५५) हे शेतकरी शेतातील काम उरकून म्हैस घेऊन अंबाजोगाई – अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरुन घराकडे जात असताना घाटनांदूरहून अंबाजोगाई कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अशोक गित्ते हे पन्नास फूट लांब फेकल्या गेल्याने जागीच ठार झाले. शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893839
error: Content is protected !!