अंबाजोगाई

चनई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंतीनिमित्त अभिवादन. 

अंबाजोगाई प्रतिनिधी:- येथील चनई ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, कायदेपंडित, अर्थतज्ञ, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. 

    या कार्यक्रमाची सुरुवात गावच्या सरपंच रोहिणी प्रभाकर सावरे, उपसरपंच अनिल वसंतराव शिंदे, ग्रामविकास अधिकारी देशमाने एल.एम.साहेब, यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.     

      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्याय आणि समानतेसाठी समर्पित केले. अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध लढा दिला. दलित, महिला आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही शिकवण दिली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सर्व त्यांच्या कार्याचे स्मरण करत त्याच्या नावाचा जयघोष करण्यात आला. 

           या कार्यक्रमासाठी चनई गावच्या सरपंच रोहिणी प्रभाकर सावरे, उपसरपंच अनिल वसंतराव शिंदे, ग्रामविकास अधिकारी देशमाने एल.एम.साहेब, बार्टी चे समतादूत व्यंकटेश जोशी, ग्रामपंचायत सदस्य प्रविण भागवतराव कदम, वैजनाथ कणसे,संजय चौगुले,फुलाबाई रामदास गोचडे,विलास सावरे,भारत मोरे,,प्रभाकर सावरे, ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!