मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे बक्षीस वितरण संपन्न
अंबाजोगाई प्रतिनिधी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत शुक्रवारी (दि. २५) पंचायत समितीच्या सभागृहात बक्षीस वितरण पार पडले. यावेळी जिल्हा परिषद गट व संस्था गटातील सहा शाळांना बक्षिसाच्या रक्कमेचा चेक वितरित करण्यात आला.
राज्यातील सर्वच शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानांत शाळांना लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व जिल्हा परीषदेच्या व खाजगी शाळे मध्ये हे अभियान राबवीण्यात आले. शासनाने ठरवून दिलेले निकष पुर्ण करण्याऱ्या शाळांची तपासणी होऊन त्यांना प्रथम, व्दितीय व तृत्तीय बक्षीस जाहीर करण्यात आले. याचे बक्षीस वितरण शुक्रवारी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले. गटविकास अधीकार समृध्दी दिवाणे, गटशिणाधिकारी चाँद शेख, विस्तार अधीकार बी. के. नांदुकर, मधुकर सुर्वणकार, मुमताज पठाण यांच्या हस्ते बक्षीसाच्या रक्कमेचा चेक वितरीत करण्यात आला. तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास संस्था गटाअंतर्गत दुसरे बक्षीस मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक प्रा. एन. के. हजारे, प्रा. पी. एस. तरकसे, केंद्रप्रमुख आर. जी. पवार यांनी बक्षीसाच्या रक्कमेचा दोन लाख रुपयांचा चेक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्विकारला. या कार्यक्रमास तालुक्यातील मुख्याध्यापक विस्तारधीकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.
सहा शाळांना बक्षीस
जिल्हा परिषद गट व संस्था गटातील शाळा अश्या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परीषद गटात प्रथम जि. प. मा. शा. राडी, व्दितीय जि. प. प्रा. शा. नांदगाव, तृत्तीय जि. प. के. प्रा. शा. भावठाणा. संस्था गटात प्रथम योगेश्वरी नुतन मुलांचे विद्यालय अंबाजोगाई, व्दितीय जयकिसान मा. व उच्च मा. विद्यालया आपेगाव, तृतीय श्रीरात माध्यमिक विद्यालय भारज. या सहा शाळांना बक्षीसाची रक्कम वितरीत करण्यात आली. प्रथम बक्षीस तीन लाख, व्दितीय दोन लाख तर तृत्तीय एक लाख रुपयांचे होत.