डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मौजे धावडी येथे आदर्श पुरस्कारित शिक्षिका रंजना जाधव यांचा सत्कार ; ऋषिकेश मोहके अमरावतीकर यांचे व्याख्यानं
अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे धावडी गावामध्ये आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर 134 जयंती उत्सव निमित्त धावडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श पुरस्कारीत शिक्षिका रंजना नाथराव जाधव यांचा आशा वर्कर प्रीती मस्के आणि शिता तरकसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षिका रंजना जाधव त्यांच्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व सांगितले याप्रसंगी बोलताना म्हणाल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो कोणी तो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही या प्रसंगी त्या म्हणाल्या मुलांना रोज शाळेत पाठवण्यासाठी आपल्या पाल्यांनी प्रयत्न करावे त्या नंतर प्रसिद्ध वक्ते ऋषिकेश मोहके अमरावतीकर यांचे व्याख्यानं झाले त्या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिक्षणाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने सांगितले याप्रसंगी उपस्थित जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष भारत तरकसे उपाध्यक्ष तुषार होके.विनोद तरकसे कृष्णा तरकसे राम मुंडे तसेच उपस्थित गावचे सरपंच काशिनाथ घुले उपसरपंच दयानंद तरकसे ग्रामसेवक जितेंद्र पोटभरे तंटामुक्ती अध्यक्ष महादेव नेहरकर ग्रामपंचायत कर्मचारी नागनाथ केंद्रे आशा वर्कर प्रीती मस्के दैनिक बीडसत्ता वृत्तपत्र अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी प्रशांत मस्के तसेच मौजे धावडी चे समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती साजरी करण्यात आली