अंबाजोगाई

समाजातील गरजूंना मदत होईल असे कार्य करून जन्मोत्सव साजरा करणे ही काळाची गरज – जगदीश पिंगळे, 

 

पेशवा प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमाने भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील पेशवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे म्हणाले की, समाजातील गरजूंना मदत होईल असे कार्य करून जन्मोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. विविध संघटना वेगवेगळे उपक्रम राबवितात परंतु पेशवा प्रतिष्ठान यांनी राबविलेले उपक्रम हे नेहमीच समाजपयोगी असतात.

यावेळी व्यासपीठावर गणपतराव व्यास, रामभाऊ कुलकर्णी, सौ रोहिणी पाठक यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यास गुरुजी म्हणाले की , तरुणांनी उद्योगाकडे वळावे,हि काळाची गरज असून सध्या सगळ्यांना नोकरी मिळणे शक्य नाही व व्यवसायात तरुणांना यश मिळण्यासाठी चिकाटी व प्रयत्न महत्वाचे आहेत. रामभाऊ कुलकर्णी ,रोहिणी पाठक , राहुल कुलकर्णी, प्रशांत बर्दापूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भगवान श्री परशुराम यांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर परशुराम विद्यार्थी सहाय्यक मंडळा तर्फे पवन कुलकर्णी या एम बी बी एस ला शिकणाऱ्या विद्यार्थ्यास बिनव्याजी ५० हजार रू शैक्षणिक मदत देण्यात आली. मदतीचे हे चौथे वर्ष आहे.तसेच नवनाथ जोशी यांच्या नृसिंह वेदशाळेला रू पाच हजारांची मदत करण्यात आली. या प्रसंगी योगेश्वरी वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन व समाज भूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रशांत बर्दापूरकर, डॉ कौस्तुभ कुलकर्णी, स्मिता भातलवंडे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा मुकुंद जोशी यांना पीएचडी मिळाल्याबद्दल तर सौ स्मिता धावडकर यांची उप मुख्याध्यकापदी पदोन्नती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश अकोलकर यांनी केले. सूत्र संचालन डॉ संकेत तोरंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रणिता पोखरीकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत श्रीकांत जोशी, केदार दामोशन , ऍड वैजनाथ वांजरखेडे, पार्थ कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, अक्षय देशमुख,अनिता औटी, रोहिणी जड, अपर्णा भालेराव, साधना विर्धे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ब्रह्मवृंदाची उपस्थिती होती.. कार्यक्रम यशस्वितेसाठी पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला. यावेळी ब्रह्मवृंदाची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!