अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रहदारीच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवण्यात न आल्याने आज 05 मे पासून न.प.कार्यालयासमोर उपोषण सूरू करण्यात आले असून,न.प.प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर(चाऊस लाकडी अड्डा, भिसे मळा) परिसरात गेल्या 40 ते 50 वर्षापासून नागरिक राहतात. न.प.कडून कसल्याच मुलभूत सोयी सुविधा नाहीत.येथील सर्व नागरिक अत्यंत साधारण कुटुंबातील आहेत.असे असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून ये-जा करणाऱ्या रस्त्यावरच चाऊस नामक व्यक्तिने पञ्याचा डब्बा टाकून अतिक्रमण केले आहे.त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.न.प.च्या रस्ते नकाशावर सदरील रस्ता हा अंदाजे 20 फूट रूंदीचा असल्याची माहीती समोर आली आहे.तेव्हा या रस्त्यावर संबंधित व्यक्तिनी न.प.मालकीच्या रस्त्यावरच अतिक्रमण करून लोखंडी पञ्याचा डब्बा टाकल्याने तो रस्ता अरुंद होवून फक्त 5 फूटाचा राहिला आहे.सदरील रस्त्यावरून संबंधित नागरिक काम धंदे, रोजंदारी,मुलांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी ये-जा करतात.आमच्या घरात वृध्द मंडळींना आरोग्याची समस्या आहे,लहान थोर मंडळींचे सुख-दु:ख असो वा तसेच गर्भवती महिलांना अर्ध्या राञी दवाखान्यात नेण्याचा हाच एकमेव जवळचा मार्ग रस्ता आहे.या ठिकाणी संबंधित व्यक्तिने लोखंडी डब्बा टाकून अतिक्रमण केल्याने भविष्यकाळात येथील नागरिकांना मोठी गैरसोय होवून अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ येईल.अशी भिती व्यक्त होत आहे.त्यामुळे तत्काळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रहदारीस रस्ता मुक्त करावा.अन्यथा न.प.कार्यलयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.असा इशारा काही दिवसांपूर्वीच संबंधित नागरिकांनी न.प.मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे दिला होता या प्रकरणी मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण हटवण्यात येईल असे आश्वासन दिले होते.परंतु या प्रकरणी न.प.प्रशासनाने कसलीच दखल घेतली नाही. त्यामुळे सदरील अतिक्रमण हटवण्यात यावे या मागणीसाठी आज दि.05 मे 2025 रोजी न.प.कार्यालयासमोर उपोषण सूरू केले असून न.प.प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
यावेळी सुधाकर काचरे,मुकुंद काचरे,नंदकुमार शितोळे,विष्णू शर्मा,शितल शर्मा,सिध्देश्वर पवार,पिंटू लाडके,मुन्ना लोहार, संजय शितोळे,सौ.सुशिला लाडके,सौ.संगिता काचरे,सौ.शांताबाई पवार,सौ.सुनंदा काचरे आदी उपोषणास बसले आहेत.