अंबाजोगाई

अंबाजोगाई शहर व परिसरात वादळी वाऱ्या सह गारांच्या पाऊस, मोठ्या प्रमाणात नुकसान, मगरवाडी येथे सचिन मगर नामक व्यक्तीच्या अंगावर वीज पडून मृत्यू   

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    अंबाजोगाई शहर व परिसरात वादळी वाऱ्या सह गारांच्या पावसा मूळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये तालुक्यातील मगरवाडी येथील सचिन मगर नामक व्यक्तीच्या अंगावर वीज पडून तो मयत झाला आहे  

   अंबाजोगाई शहर व परिसरात आज दुपारपासून अचानक वादळीवाऱ्यास सुरुवात झाली याचवेळी विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाला सुरुवात झाली या वादळीवाऱ्यामुळे शहर परिसरातील अनेक मोठमोठी झाडे पडली, या वादळी वाऱ्यात आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आंबा उत्पादकाच्या तोंडाशी आलेला घास यामुळे निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या मूळे वीज पुरवठा खण्डीत झाला आहे. शिवाय पावसामुळे शहरात सुरू असलेल्या रस्त्या व नाल्याच्या कामामुळे पाणी रस्त्यावर आले त्यामुळे पादचारी व्यक्तीसह वाहनधारकांना या पाण्यातून मार्ग काढणे अवघड होऊन बसले याचवेळी परिसरात अनेक ठिकाणी वीज पडल्याचे वृत्त असून यामध्ये तालुक्यातील मगरवाडी येथे सचिन मधुकर मगर हा 38 वर्षीय इसम आपल्या दोन सहकाऱ्या सह शेतातील जांभळीच्या झाडाखाली बसला असता सचिन मगर याच्या अंगावर वीज कोसळली आणि तो गंभीर जखमी झाला सचिन मगर यास स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले असता रस्त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. स्वाती रुग्णालयात नेल्यानंतर तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने जाहीर केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!