अंबाजोगाई

मा ना अजितदादा पवार यांनी केवळ अधिष्ठाता कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लाल दिव्याच्या गाडीतूनच रुग्णालय परिसरातील इमारत बांधकामाची केली पाहणी…

परळी येथील मारहाण प्रकरणातील जखमी शिवराज दिवटेची भेट घेण्याचीही तसदी न घेता घेतला काढता पाय

 

आंबजोगाई (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार यांनी आज अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात येऊन अधिष्ठाता कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर आपल्या नंतर लाल दिव्याच्या गाडीत बसूनच स्वा रा ती रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या इमारत बांधकामाचा पाहणी केली.
विशेष म्हणजे राज्यभर गाजत असलेल्या परळी येथील मारहाण प्रकरणातील जखमी शिवराज दिवटे हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार अर्थ दाखल असताना आणि याची विविध राजकीय पक्ष, संघटनेचे नेते, कार्यकर्ते येऊन भेट घेत असताना अजित दादा यांनी मात्र दिवटे याची भेट घेण्याचीही तसदी न घेता त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला त्यामुळे नागरिकात संतप्त भावना व्यक्त होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना अजितदादा पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून परळी येथील दौरा अटपुन दादांचे सकाळी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आगमन झाले. नियोजित कार्यक्रमानुसार दादा आज येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील बाह्य रूग्ण विभागाच्या व मुलांच्या वस्तीगृहाची नूतनीकृत इमारतिची पाहणी आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय बी बिल्डिंग सर्जिकल वार्ड व नूतन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर चे लोकार्पण करणार होते आणि त्या नंतर श्री. राजकिशोर (पापा) मोदी यांचे निवासस्थानी स्नेहभोजन करणार होते.
अजित दादा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले खरे मात्र त्यांनी थेट अधिष्ठाता कार्यालयात जाऊन सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बैठक संपताच कुठल्याही इमारतीची पाहणी न करता किंवा कोणत्याही इमारतीचे लोक अर्पण न करता दादा आपल्या लाल दिव्याच्या गाडीत बसले आणि थेट गाडीतूनच दोन्ही बाजूस नजर टाकत थेट राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.
विशेष म्हणजे मागील तीन दिवसापासून राज्यभर गाजत असलेल्या परळीतील मारहाण प्रकरणातील जखमी शिवराज दिवटे हा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार अर्थ दाखल असताना आणि याची विविध राजकीय पक्ष, संघटनेचे नेते, कार्यकर्ते येऊन भेट घेत असताना अजित दादा यांनी मात्र दिवटे याची भेट घेण्याचीही तसदी न घेता त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. अजित दादा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास भेट देणार असल्याचे कारण पुढे करून आज सकाळी आठ वाजले पासूनच रुग्णालय परिसरातील कोणत्याही इमारतीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकास जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला होता त्यामुळे रुग्णांची ही मोठी हेळसांड झाली मात्र दादानी साधे इमारती कडे डोकावलेही नाही पर्यायाने रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक रित्या मनस्ताप सहन करावा लागला त्यामुळे रुग्ण व नागरिकात संतप्त भावना व्यक्त होत आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींचाही भ्रमनिरास

राज्यभर परळी येथील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण गाजते आहे आणि हाच शिवराज दिवटे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहे याला भेटण्यासाठी विविध पक्षाचे नेते नेत्यांची रीग लागली असून विविध इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी अंबाजोगाईत तळ ठोकून आहेत अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते अजित दादा जखमी शिवराज दिवटे याची भेट घेतील व बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी विषयी चर्चा करतील असा सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी कयास लावला होता त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक चॅनेल चे प्रतिनिधीनी रुग्णालय परिसरात तळ ठोकला होता. मात्र दादा अधिष्ठाता कार्यालयातील बैठक आटोपती घेऊन कुठलाही माध्यम प्रतिनिधीला न भेटता, न चर्चा करता निघून गेल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचा भ्रमण निरास झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!