भाजपचे माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांचे अपघाती दुर्दैवी मृत्यू जिल्यात शोककळा*
अंबेजोगाई प्रतिनिधी:—
औसा येथून परळी कडे येताना झाला भिषण अपघात
परळी येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा 13 व्या महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य आर. टी. देशमुख यांचे आज सायंकाळी अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मुळ रहिवासी असलेले आर. टी. देशमुख यांनी लोकनेते तथा केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पक्षात प्रवेश केला आणि ते कायम भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहीले.
गोपिनाथ राव मुंडे यांच्याच मुळे ते 13 व्या विधानसभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातुन प्रचंड मतांनी विजयी झाले तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश मध्ये महत्वाच्या पदावर काम करू शकले.आज सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र 361 वरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जातांना रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी स्लीप होवुन सुरक्षा कठडा तोडून सदरील गाडी चार वेळेस पलटी झाली. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी लातुर येथे नेत असता त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ आणि सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका असल्यामुळे ते सर्व परीचित होते.