अंबाजोगाई

पॉवरग्रीड व साखर कारखाणा मधील साहीत्य चोरणारी टोळी पकडण्यात बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश.

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

  अंबाजोगाई येथील पावरग्रेड व परळी येथील साखर कारखाना येथे झालेल्या साडेतेरा लाख रुपयांच्या चोरीचा तपास लावण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी सहा आरोपीस अटक करण्यात आले आहे. 

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हयातील मौजे शेपवाडी येथील पॉवरग्रीड येथील 12,95,000/- किमतीचे ॲल्युमिनीयमचे साहीत्य चोरीस गेलेले होते व परळी वैजनाथ येथील साखर कारखाण्यामधील 60,000/- किमतीचे पितळी साहित्य चोरी गेले होते. या गुन्हयांचा तांत्रिक विश्लेषन व समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी नामे शेख जावेद शेख हबीब व त्याचे साथीदार तसेच बंडु लक्ष्मण जोगदंड व त्याचे साथीदार या दोन्ही टोळयांनी चोरले आहे. त्या टोळी मधील आरोपी परळी येथे आहेत त्यावरुन लागलीच

श्री नवनित काँवत, पोलीस अधीक्षक बीड,श्रीमती चेतना तिडके,अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड व पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे यांची टिम पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, विष्णु सानप, नितीन वडमारे व सचिन आंधळे विकी सुरवसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड हे आरोपी शोध कामी परळी येथे आले. तेथे जावुन टिमने आरोपीचा शोध घेतला असता मोठया शिताफीने यातील आरोपी शेख जावेद हबीब, वय 39 वर्ष, रा.बरकर नगर परळी वै. जि.बीड बंडु लक्ष्मण जोगदंड, वय 50 वर्ष, रा.रुमना जवळा ता.गंगाखेड, जि.परभणी ह.मु शिवाजीनगर परळी वै,.विजय नारायण जोगदंड, वय 42 वर्ष, रा. भिमनगर परळी वै जि.बीड,शेख अब्दुल रौफ ईस्माईल, वय 45 वर्ष, रा. जुना रेल्वे स्टेशन परळी वै जि.बीड,.प्रेम रावसाहेब वाघमारे, वय 19 वर्ष, रा. नागसेननगर परळी वै जि.बीड, संतोष सोपान कांबळे, वय 30 वर्ष, रा मिलींदनगर परळी वै जि.बीड. यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्याचे कडुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व परळी ग्रामीण असे चोरीचे दोन गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यातील चोरीस गेलेले ॲल्युमिनीयम साहीत्य कोणास विकले, कोणाकडे आहे याचा संयुक्तरित्या शोध पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड हे घेत आसुन पॉवरग्रीड व कारखाण्यामधील सामान चोरणारी टोळी पकडल्याने चोरीवर आळा बसेल अशी अशा करायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!