आंबजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई व उपविभागातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री. नवनीत काँवत (भा.पो.से) हे आज अंबाजोगाई शहरात येत असून जनसंवाद बैठकीच्या माध्यमातून आज ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
बुधवार दि. १८ जुन २०२५ रोजी सायं. ०५ वा. अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस
मा.श्री. नवनीत काँवत (भा.पो.से) (पोलीस अधिक्षक, बीड) व श्रीमती चेतना तिडके (म.पो.से) (अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई) हे अंबाजोगाई उप विभागातील सर्व प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधणार असून या उपविभागातील कायदा व सुव्यवस्थे विषयी ज्या काही समस्या आहेत त्या मांडण्या साठी, त्यावर उपाययोजना सुचवण्या साठी अंबाजोगाई उपविभागातील सर्व क्षेत्रातील नागरिकांसह पत्रकार बांधवानी या जनसंवाद बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोगदंड व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप, बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ससाने यांच्या वतीने करण्यात आले आहे.