चोरट्यांनी ७० शेळ्या लांबविल्या…
अंबाजोगाई प्रतिनिधी:–तालुक्यातील खापरटोन येथील शेतातील शेळ्याच्या शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी शनिवार (दि.२१)रोजी रात्री शेळ्या,बोकड व पिल्ले असा एकूण ७० जनावरे अंदाजे किंमत ४,७२,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात घरफोडी,दुचाकी चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत होती मात्र आता चोरट्यांनी शेळ्या चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे.अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथील बालाजी मुरलीधर फड (वय ४५) यांच्या शेतातील शेळ्याच्या शेडचे कुलूप व शेडची जाळी तोडून अज्ञात चोरटयांनी शनिवार (दि.२१)रोजी काळ्या,पांढऱ्या रंगाचे एकूण ४८ शेळ्या व बोकड अंदाजे किंमत ८००० रुपये प्रमाणे एकूण ३,८४,००० रुपये व २२ शेळ्यांची पिल्ले अंदाजे किमत ८८,००० रुपये असा एकूण ४,७२,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.