गुटख्याची अवैध रित्या वाहतूक, 4 लाख 96 हजार 820 रुपयाचा ऐवज जप्त, स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही…
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
स्वतःच्या कारमधून गुटख्याची अवैध रित्या वाहतूक करणारे होळ येथिल राहिवासी अजय उर्फ ऋषिकेश शिंदे यास बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडून कार सह 4 लाख 96 हजार 820 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शना खाली
पोलीस उप निरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकातील पो हवा रामचंद्र केकान, पोना गोविंद भताने व पो शी सचिन आंधळे यांच्या टीमला आज दिनांक 01/07/2025 रोजी अंबाजोगाई पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, अजय उर्फ ऋषिकेश शिंदे राहणार होळ हा ईसम अवैध रित्या स्वतःच्या कारमधून गुटख्याची अवैध रित्या वाहतूक करत आहे.
या गोपनीय माहिती च्या आधारे या टीम ने सापळा रचुन सदर कार ताब्यात घेऊन पाहणी केली असतात कार मध्ये वेग वेगळ्या कंपनीचा पान मसाला, गुटखा असा 46820 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या पथकाने कार सह 4 लाख 96 हजार 820 रुपयाचा ऐवज जप्त करून ऋषिकेश शिंदे याचे विरुद्ध अंबाजोगाई शहर पो स्टे मध्ये गुन्हा दाखल केला आहे.