*पक्षाने दिलेली जवाबदारी निष्ठेने संभाळून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार :- महादेव आदमाने*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी सभापती महादेव आदमाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार संजय दौंड,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बबनभैया लोमटे यांच्या उपस्थिती मध्ये महादेव आदमाने यांना त्यांच्या निवडीचे नियुक्तिपत्र देण्यात आले. महादेव आदमाने यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.
महादेव आदमाने यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राजकिशोर मोदी यांच्या शिफारशीनुसार तसेच आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव आदमाने यांना अंबाजोगाई शहराच्या अध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आदमाने हे प्रयत्न करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या अत्यंत जवळचे शांत, संयमी, सतत हसतमुख, सामाजिक कार्यात तन-मन-धनाने अहोरात्र अग्रेसर असणारे वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव आदमाने यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जवाबदारी टाकली आहे.
पक्षश्रेष्ठींनी टाकलेली जवाबदारी अत्यंत निष्ठेने सांभाळून पक्षवाढीसाठी तसेच सामान्य नागरिकांच्या हितासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित शहर अध्यक्ष महादेव आदमाने यांनी सांगितले. कॉलेज जीवनापासूनच प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला असून बिकट परिस्थितीत देखील अबालवृधासाठी लढा उभा केला आहे. रस्त्यावरील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून चळवळीत आपले जमेल तसे योगदान देऊन हातभार लावला आहे. त्यामुळेच जनतेने माझ्या कुटुंबात नगरसेवक पद दिले आहे. सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करत आपण गोरगरीबांना न्याय मिळवून देत , समाज विघातक शक्तींना रोखण्याचे काम करू असा शब्द देखील आपल्या निवडीबद्दल महादेव आदमाने यांनी दिला आहे.