अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल
अंबाजोगाई प्रतिनिधी :- अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा
महत्वपूर्ण निकाल सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची मांडली भक्कमपणे बाजु अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणा-या नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, पिडीत मुलगी ही तिच्या आई-वडीलांसोबत उसतोडीसाठी गेली होती. अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईसोबत ती दवाखान्यात गेली असता डॉक्टरांनी तिला गरोदर असल्याने सांगितले. त्यानंतर तिच्या आईने तिला विश्वासात घेवुन विचारले असता, पिडीत मुलीने सांगितले की, तिचा बाप आरोपी बाळु उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड हा गेल्या सात ते आठ महिन्यापासुन दारु पिवुन तिच्यावर उमराई येथील राहतेघरी तिची आई घरी नसताना जबरदस्ती करून शारीरीक संबंध करत होता आणि त्यातूनच ती गरोदर राहिली. या सर्व माहितीवरील पिडीतीने दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी पोलिस ठाणे धारूर येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं क. 24/2024 कलम 376, 376 (2) (एफ), 376 (2) (आय), 376 (2) (एन) भादंवी, 4(2), 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.सदर गुन्हयाचा संपूर्ण तपास पीएसआय प्रकाश शेळके यांनी करुन न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात खटला सुरू होवुन सरकार पक्षाच्या वतीने एकुण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामुध्ये पिडीत मुलगी, तिची आई व डीएनए प्रोफाईल करणारा साक्षीदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अॅड. लक्ष्मण फड यांनी भक्कमपणे बाजु मांडत आरोपीने हे कुकर्म केले आहे हे सरकार पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध केले आहे ही बाब न्यायालयाने निकालात नोंद केली. तसेच आरोपीने केलेले कृत्य हे अमानवी आहे व असा प्रकार एखाद्या दुर्मिळ प्रकरणात होतो. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाने मान्य करून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायधीश अजितकुमार भस्मे यांनी ठोठावली. या निकालाबद्दल विविध सामाजिक संघटना व वकील वर्गातून सरकारी वकील ऍड. लक्ष्मण फड यांचे अभिनंदन होतआहे