अंबाजोगाई प्रतिनिधी :-
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमीत्त दिनांक 31/07/2025 रोजी गावातील वीर फकिरा प्रतिष्ठाण धानोरा बु. च्या वतीने जिल्हा परिषद शाळा धानोरा बु. येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 30 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे मुख्यआयोजक वीर फकिरा प्रतिष्ठाण धानोरा बु. यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद शाळा येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी फकिरा प्रतिष्ठाण धानोरा बु. चे मान्यवर अध्यक्ष फकिरा प्रतिष्ठान व ग्रा.प.सदस्य देवानंद काळुंके, माजी सरपंच व भाजपचे तालुका सरचिटणीस मेघराज सोमवंशी, दलीत आघाडीचे तालुका अध्यक्ष सुधाकर काळूंके, ग्रां. पं.सदस्य पप्पू आदनाक, माजी ग्रा.प.सदस्य हणमंत लाड, फकिरा प्रतिष्ठान उपाध्यक्ष भगवान काळूंके, अमोल काळुंके, विश्वास काळूंके, लखन काळूंके, कृष्णा काळूंके, संतोष काळूंके, ब्रम्हानंद काळूंके, आदीनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. एखाद्याच जीव घेण्यापेक्षा आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याच जीव वाचेल हेच अण्णाभाऊंच्या विचारणाचा वारसा पुढे चालवला. अण्णाभाऊंची जयंती डीजे समोर नाचून नाहीतर पुस्तक वाचून जयंती साजरी करणार. असा प्रण केला आहे. वंचित पीडित व आरोग्य व्यक्तींना रक्तदानातून त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सहकार्य व्हावे यासाठी एक पाऊल पुढे टाकत सर्व महामानवांच्या विचारांचा वारसा फकिरा प्रतिष्ठानच्या वतीने पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक प्रयत्न म्हणजे आज आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर होय.