अंबाजोगाई प्रतिनिधी:–
मातंग समाजातील प्रलंबित प्रश्नांवर दीर्घकाळापासून सातत्याने आणि अभ्यासपूर्वक लढा देणारे मातंग समाजाचे हुशार, वैचारिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व – मा. आमदार श्री. अमित जी गोरखे साहेब – यांनी गेल्या अनेक वर्षांत विधानभवनात आणि शासन पातळीवर उल्लेखनीय कार्य केले आहे.
मा. गोरखे साहेब यांनी समाजाच्या विकासासाठी व हक्कांसाठी स्वतःच्या जीवाचं रान करून, प्रामाणिक व निस्वार्थीपणे लढा उभारला आहे. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, समाजातील येणाऱ्या पिढीला न्याय आणि संधी मिळावी, तसेच त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
अभ्यासू आणि ठाम मांडणी
विधानभवनात अनेक महत्त्वाचे मातंग समाजाचे मुद्दे मा. गोरखे साहेब यांनी अभ्यासपूर्वक, ठोस पुराव्यांसह आणि निर्भयपणे मांडले आहेत. यामध्ये –
बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन
अनुसूचित जाती उपवर्गीकरण बदर समिती अहवाल व शासन निर्णय निवडणूकपूर्व काढून घेणे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाचक अटी रद्द करणे
पाच वर्षांसाठी महामंडळाला शासन हमीचा निर्णय
अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी
हे सर्व विषय केवळ मांडणीपुरते मर्यादित न राहता, त्यांच्या अंमलबजावणीसाठी ते मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करतात. विशेषतः अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा निर्णय लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी ते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
समाजाच्या न्यायहक्कासाठी पोटतिडकीने कार्य
मातंग समाजातील अनेक पिढ्यांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी जेवढी अभ्यासू दृष्टिकोन, धाडसी मांडणी आणि शासन पातळीवर लढण्याची ताकद आवश्यक आहे, ती मा. गोरखे साहेबांनी सिद्ध केली आहे. अनेक आमदार आणि मंत्री समाजातून झाले असले तरी, समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळवून देण्यात अपयश आले. पण मा. अमित जी गोरखे साहेबांनी हे प्रश्न केवळ जाहीर सभांमध्येच नव्हे, तर विधानभवन आणि मंत्रालयात ठामपणे उपस्थित करून त्यावर ठोस उपाययोजना व्हावी यासाठी सातत्याने कार्य केले आहे.
मुख्यमंत्री महोदयांना एकमुखी आग्रह
आज महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारकडे एकमुखी आवाहन आहे —
> “मा. आमदार श्री. अमित जी गोरखे साहेब यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात यावे. यामुळे मातंग समाजाच्या न्याय, विकास आणि हक्कांच्या लढ्याला शासन पातळीवर अधिक बळ मिळेल.”
सरकारवरील विश्वास
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर मातंग समाजाचा पूर्ण विश्वास आहे. विशेषतः मा. फडणवीस साहेबांनी, मा. गोरखे साहेबांच्या माध्यमातून, समाजाच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजाचा हा दृढ विश्वास आहे की, गोरखे साहेबांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्यांच्या अनुभव, अभ्यास आणि समाजाशी असलेली जवळीक यामुळे मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यात आणि विकासाच्या वाटचालीत ऐतिहासिक पाऊल उचलले जाईल.
— समस्त मातंग समाज, महाराष्ट्र