अंबाजोगाई (प्रतिनिधी)-:शेपवाडी परिसरात तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 17/08/2025 रोजी गोपनीय माहीती मिळाली कि शेपवाडी परिसर येथे योगेश शेप यांचे पत्राचे शेडमध्ये काही ईसम हे पत्यावर पैसे लावुन तिरंट नावाचा जुगार खेळ खेळत आहेत व खेळवित आहे अशा गोपनिय माहीती वरुन सदर ठिकाणी मा पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई यांचे आदेशाने माहितीचे ठिकाणी जावुन छापा मारला असता त्याठिकाणी गोलाकार पध्दतीमध्ये 4 ईसम नामे 01) अंजिंक्य कदम 02) धनराज चाटे 03) योगीराज शेप 04) लक्ष्मण शेप सर्व राहणार अंबाजोगाई बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळतांना व खेळवित असताना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन तिर्रट जुगाराचे साहित्य व नगदी 9300/- रुपायाची रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटार सायकल किमंत अंदाजे 3,98,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल असा एकुन 4,07,300/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 415/2025 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही ही मा. नवनित काँवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. ऋषीकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री शरद जोगदंड, सपोनि कांबळे, पोउपनि अनंद शिंदे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, हनुमंत चादर, प्रविणकुमार गित्ते, भागवत नागरगोजे, सुशांत गायकवाड यांनी केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार अमोल गायकवाड करत आहेत