अंबाजोगाई प्रतिनिधी :–
बीड पोलीस अधीक्षकाचा कार्यकाल सांभाळल्या पासून माननीय नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील अवैद्यरीत्या धंदे करणाऱ्यावर पोलिसांची जरब बसली आहे. याच अनुषंगाने अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे काल दिनांक १८/०८/२०२५ रोजी अंबाजोगाई शहरात अवैद्यरित्या विना परवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारुची क्रेटा मधुन वाहतुक करीत आहेत. अशी गोपनिय बातमी मिळाल्यावरुन सहा. पोलीस अधिक्षक श्री शिंदे साहेब, व पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथील अधिकारी कर्मचारी यांनी करून कार्यवाही करून बालासाहेब माणिक केंद्रे रा. धावडी ता. अंबाजोगाई जि. बीड यांचेकडून क्रेटा गाडी क्रमांक MH १२ BZ २२११ ही विदेशी दरुच्या बाटल्यासह एकुण १४,३७,८४० रुपयाचा माल जप्त करून पोस्टेला गुन्हा क्रमांक ४१६/२०२५ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही ही मा. श्री नवनीत काँवत, पोलीस अधिक्षक साहेब बीड, मा. श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधिक्षक साहेब अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथे नव्याने रुजू झालेले सहा. पोलीस अधिक्षक श्री ऋषीकेश शिंदे,पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोउपनि शिंदे, पोह/१६७१ गायकवाड, पोह/१६९८ गुट्टे, पोह/१५७५ आचार्य, पोह/१४८५ वडकर, पोअं/१९५४ गायकवाड, पोअं/१९५४ गित्ते आदी कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई केली आहे.