अंबाजोगाई (प्रतिनिधी)-:
अंबाजोगाई परिसरात मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 19/08/2025 रोजी मा. श्री. ऋषिकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उपविभाग अंबाजोगाई यांचे आदेशान्वये अंबाजोगाई शहरामध्ये अवैधरित्या मटका जुगार खेळणारे व खेळविणारे ईसमांबर जुगार रेड करण्याचे आदेश दिल्याने गोपनिय माहीती वरुन अंबाजोगाई शहरामध्ये जुगार रेड केली असता 01) राहुल गायकवाड 02) असलम मोईम शेख 03) महेश शिवराम घुले (04) सोमनाथ सुदाम पवार व बुक्की मालक 05) चाँद गवळी 06) गणेश नागरगोजे (07) अन्वर सय्यद सर्व राहणार अंबाजोगाई यांचेवर जुगार रेड करुन त्यांचे ताब्यातून जुगार साहीत्य व नगदी पैसे 60790/- रुपायाचा माल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. नवनित कौवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ऋषीकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अंबाजोगाई,पोनि श्री शरद जोगदंड,पो.उप.नी संजय फड, महादेव आवले, मुकेश खरटमोल, अशोक खेलबुडे नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग अंबाजोगाई व पोलीस कर्मचारी हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, नेमणुक अंबाजोगाई शहर यांनी केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार विजयकुमार गायकवाड हे करीत आहेत.