अंबाजोगाई प्रतिनिधी:-
पाण्याची टाकी आंबा साखर कारखाना रोड वरील न्यू दरबार हॉटेल येथे रात्री साडेआठच्या सुमारास मित्रांसोबत जेवण करत असलेल्या अविनाश शंकर देवकर या तरुणाचा डोक्यात तिक्षण हत्याराने सपासप वार करून खून करून पळून गेलेल्या आरोपीस अंबाजोगाई शहर पोलिसांनी पाठलाग करत तुळजापूर येथून अटक केली आहे. खुनातील आरोपीस काही तासात तुळजापूर येथे अटक केल्याने अंबाजोगाई पोलीसांचे कौतुक होत आहे.मयत अविनाश याच्या आई अंजना यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणेत फिर्यादीत म्हटले आहे माझा मुलगा अविनाश शंकर देवकर वय 35 वर्षे यास लातुर रोड येथील हॉटेल दरबार येथे मारहान झाली आहे. दिनांक 26/08/2025 रोजी थोड्या वेळाने अविनाश याचा मित्र सलमान मुस्ताफा शेख रा. झारे गल्ली अंबाजोगाई यांने सांगितले मी व अविनाश व स्वराज कारभारी पौळ रा. योगेश्वरीनगरी अंबाजोगाई असे आम्ही लातुर रोडवरील हॉटेल न्यु दरबार येथे रात्री 8.30 वाजणेच्या सुमारास दारू पित बसलो होतोत. त्यावेळी अविनाश व स्वराज यांचेत पैशाच्या व्यवहाराचा वाद चालु होता. अविनाश हा बाजुच्या केबीनमध्ये गेला. त्याचे पाठीमागे स्वराज गेला. मोठ्याने आवाज आल्याने मी बाहेर येऊन पाहीले असता स्वराज हा अविनाश यास कोयत्या सारख्या धारदार हत्याराने डोक्यावर मारहान करीत होता. मी अविनाश यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता माझ्या उजव्या हाताचे बोटावर हत्याराने वार करून स्वराज हा तेथून पळुन गेला, त्यांनतर मी घाबरुन माझी गाडी घेवुन पोलीस स्टेशनला आलो. असे मला सलमान यांने सांगितले.माझा मुलगा अविनाश यास स्वराज कारभारी पौळ रा. योगेश्वरीनगरी अंबाजोगाई याने पैशाचे देण्याघेण्याच्या माझा मुलगा कोयत्या सारख्या धारदार हत्याराने डोक्यात मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे. म्हणुन माझी त्यांचे विरुध्द तक्रार आहे.मयत अविनाश याच्या पश्चात आई वडील, भाऊ ,पत्नी ,दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घरातील कर्त्या मुलाचाखुन झाल्याने देवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ होत आहे. अविनाश देवकर याचा मृतदेहाचे शवविच्छेदन चालू असून पोलिसांनी स्वराज पौळ यास पहाटे अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास एपीआय राजेंद्र घुगे हे करत असून यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे ,पीएसआय पवार, पीएसआय शिंदे, पोलीस हवालदार नागरगोजे, गुट्टे व इतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत पर जिल्ह्यामध्ये पळून गेलेल्या स्वराज पौळ यास नाट्यमयरीत्या सहा तासातच अटक केली आहे. यामुळे आंबेजोगाई शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.