अंबाजोगाई प्रतिनिधी:–
गणपतीचे आगमन होताच पावसाने पण बप्पा चे स्वागत केले तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तुच कर्ता आणि करविता मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया अशा अनेकविध गाण्यातून महती वर्णन केलेला गणेश उत्सव सुरुवात झाला बुधवारी घरोघरी गणरायाचे आगमन झाले सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गणेश मूर्ती आणण्याची लगबग बुधवारी होती मूर्तीआणि पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती गणेशोत्सवाला आता सास्कृतिक महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने धुमधडाक्यात साजरा होत आहे पण बाळगोपाळांचा कुटुंबीयांमध्ये आनंदाचे भरते आणणारा हा उत्सव प्रत्येकामध्ये उत्साह पेरणारा असून त्याची तयारी काही दिवसापासून बच्चे कंपनीने सुरू केली होती बाळगोपाळांनी गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी केली होती गणेशोत्सवाच्या काळातच महालक्ष्मी गौरी उत्सव असल्याने या निमित्ताने सणाची रेलचेल आहे आणि विविध साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील पाटील चौक, मंगळवार पेठ, भाजी मंडई, गुरुवार पेठ, बस स्थानक परिसर नगरपरिषद कार्यालय परिसर या भागांमध्ये सकाळ पासून खरेदीसाठी गर्दी दिसत होती तर महाराष्ट्र सांस्कृतीक गणेश मंडळ देशपांडे गल्ली, हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ खडकपुरा, तरुण गणेश मंडळ, कुत्तर विहीर, बाल गणेश मंडळ भट गल्ली, किर्ती गणेश,मंडळ, रविवार पेठ, नवयुवक गणेश मंडळ मंगळवार पेठ नगरसंघ गणेश मंडळ अशा अनेक ठिकाणी गणपती बप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाचे युवकांनी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात प्रतिष्ठापना केली गणेशोत्सवाच्या काळात डिजे न वाजविता प्रशासनाचे नियम पाळून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे सोशल मिडियावरूनही गणेशोत्सव शुभेच्छांचे अनेक मेसेजेस सकाळ पासून सुरू होते दहा दिवस असणारा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.