अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्ताने ढोलताशा पथकांच्या भव्य अशा खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत .या ढोलताशा पथक स्पर्धेमध्ये शहरातील जास्तीत जास्त ढोलपथक संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक संकेत राजकिशोर मोदी यांनी केले आहे. ही स्पर्धा बुधवार दि ३ सप्टेंबर २०२५ रोजी शंकर महाराज वंजारी वसतिगृहाच्या मैदानात दुपारी एक वाजता संपन्न होतील असेही संकेत मोदी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. स्पर्धेतील यशस्वी संघांना भरघोस रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित देखील करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.
संकेत मोदी हे अंबाजोगाई शहर व मोदी कुटुंबाची सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरा मोठ्या जोमाने व उत्साहाने पुढे नेत आहेत. अंबाजोगाई शहरात ते अनेक वेळा वेगवेगळे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रम राबवून शहरातील विद्यार्थी, कलावंत आदींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे ते शहरातील तरुणाईच्या मनामनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत. त्याचबरोबर राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून प्रियदर्शनी क्रीडा मंडळ हे मागील ३५ वर्षांपासून शहरात विविध क्रीडा, सांस्कृतिक , शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करत आहे.
अंबाजोगाई शहरात १०० च्या जवळपास गणेश मंडळ कार्यरत आहेत. यावर्षी सलग तिसऱ्यांदा या गणेश मंडळासाठी संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून शहरातील गणेशोत्सवानिमित्त ढोल ताशा पथकांच्या भव्य अशा खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपये ३१००१/-, द्वितीय क्रमांक रुपये २१००१/- , तृतीय क्रमांक रुपये १५००१/-, चतुर्थ क्रमांक रुपये ७००१/- तर उत्तेजनार्थ रुपये ५००१/- अशा बक्षिसांची लयलूट प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. तेव्हा या स्पर्धेत शहरातील जास्तीत जास्त गणेश मंडळाच्या ढोल ताशा पथकांनी आपला सहभाग नोंदवावा असे अवाहन संकेत मोदी यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रियदर्शनी क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल झुंबडचे आयोजन देखील करण्यात येत आहे तसेच स्वा रा ती रुग्णालयातील रुग्णांसाठी भव्य असे रक्तदान शिबीर, त्याचबरोबर दीपावली निमित्त रुग्णांना फराळ वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येऊन रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम राजकिशोर मोदी तथा संकेत मोदी यांच्या माध्यमातून करण्यात येत असते.
गणेशोत्सवा निमित्ताने आयोजित खुल्या ढोल ताशा वाद्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सचिन जाधव ९९७५१७१९४४ , दत्ता सरवदे ९८९००४१००६,रोहन कुरे ,९०२८९९१०००, शुभम लखेरा ८६००६३४६००, सुशील जोशी ९८९०९ ४७८४७, शरद काळे ७६६६९३३७१७, अस्लम शेख ९६६५७४८४७५ यांच्याशी दि २ सप्टेंबर २०२५ दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संकेत राजकिशोर मोदी यांच्या वतीने करण्यात येत आहे. नियम , अटी व अंतिम निकाल हा मंडळाच्या परिक्षकाकडेच राहील व तो अंतिम व अबाधित राहील.