अंबाजोगाई प्रतिनिधी :–दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरस्वती गणेश मंडळ यांच्यामार्फत अनेक सामाजिक उपक्रमांचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात *”फिरती पुस्तक बँक,माणुसकीची भिंत”* असा आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात आपल्या घरातील जुने पुस्तके,ग्रंथ, शैक्षणिक विविध साहित्य,जुने वापरण्यायोग्य कपडे,खेळणी इतर साहित्य येथे दान द्यावे आणि जे गरजू आहेत किंवा ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी खुशाल हे साहित्य घेऊन जावे.असा हा असे हे कार्यक्रमाचे स्वरूप होते. *सर्व शाळा,कॉलेज व शैक्षणिक संस्थांना विभागांना आव्हान* आहे की या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.ही भिंत विविध वस्त्यावर जाऊन त्यांना आवश्यक असलेले कपडे, पुस्तके व खेळणी त्यांना देणार आहे.गणेश चतुर्थी दिवशी सामाजिक बांधिलकी जोपासणारे फिरती पुस्तक बँक व माणुसकीची भिंत हा कार्यक्रम घेऊन सरस्वती गणेश मंडळाने अंबाजोगाई करांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जीवन आधार वृद्धाश्रमात जाऊन सर्व आजींना आजोबा बरोबर अन्नदान करून, त्यांच्या हस्ते फीत कट करून, पुस्तक बँक व माणुसकीचे भिंतीचे अनावरण केले. ह्या वेगळ्या उपक्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे आनंद हास्य होते. या वेळी मंडळाचे समीर लाटा,निलेश मुथा,आरती मुथा योगेश परदेशी,निलेश परदेशी,सुरेश राठोड,कमलेश परदेशी, राहुल मोदी, हर्ष परदेशी,अमित परदेशी, शेखर जोशी सर्व पदाधिकारी,इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. माणुसकीची भिंतीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. ही बँक व भिंत फिरती भिंत आहे तर आंबेजोगाई करांनी भरभरून प्रतिसाद देत आहेत.वेगवेगळ्या ठिकाणी फिरून माणुसकीच्या भिंतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.माणसांच्या समूहातूनच समाजाची निर्मिती होते. मग माणसांच्या गरजाही एका अर्थाने समाजावरच यानुसारच सरस्वती गणेश मंडळाने पुस्तक दान व ‘माणुसकीची भिंत’ उभी केलीय. त्यात आपल्याला गरज नसलेले पुस्तक कपडे आणून देण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते आणि जमा झालेले वस्तू,कपडे गरजूंना पुरविले जातात. प्रेरणादायी आणि माणुसकी जपणाऱ्या या उपक्रमाला अंबाजोगाई करांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.
या उपक्रमाचा अनेक गरजूंना फायदा झाला आहे.समाजात कुणाकडे खूप काही आहे,तर कुणाकडे अंग झाकायला सुद्धा पुरेसे कपडे नाहीत, शैक्षणिक साहित्य मुळे बरेच लोक वंचित राहतात.
समाजात ही दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. ती कमी करण्यासाठी मोठा आधार ठरणारी, गेल्या काही दिवसापासून सर्वत्र चर्चेत असलेली पुस्तक बँक व‘माणुसकीची भिंत’ आता अंबाजोगाई मध्येही उभारली गेल्याने गरजूंना मदत मिळत आहे. ही फिरती माणुसकीची भिंत 5/9/2025 पर्यंत चालणार आहे.
पुस्तक दान व‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना आता सर्वत्रच लोकप्रिय होत आहे. ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा’, यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठीच आकर्षक ठरली आहे. गुरुवार पेठेत हा उपक्रम सुरू आहे. ही माणुसकीची फिरती भिंत आहे. ‘एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा’, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. उपक्रमास्थळी पुरुष, महिला, मुलांचे कपडे वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, कोणावरही स्वच्छ कपडे आणून देण्याचे बंधन नाही. शहरात पावसाळा व थंडी वाढत असल्याने ही भिंत अनेक गरजूंसाठी खऱ्या अर्थाने माणुसकीची ऊब देत आहे. यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य परीश्रम घेत आहेत. यातील बहुतांश पदाधिकारी हे व्यापारी वर्गातील आहेत समाजाला आपले काहीतरी देणे लागते या उद्देशाने आपला कामधंदा सोडून ते समाजासाठी वेळ देतात. एकमेकांना सहकार्य केल्यास समाज नैतिकदृष्ट्या उन्नत होतो. म्हणूनच ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे सुभाषित प्रचलित झाले आहे
अंबाजोगाईचा गेल्या तीन वर्षापासून प्रथम परितोषिक मिळालेला गणपती *सरस्वती गणेश मंडळ*, गुरुवार पेठ ,अंबाजोगाई.
गणेशोत्सवाचे अवचित्य साधून यावर्षीही गेल्या वर्षी पेक्षा ही जास्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व अजून आयोजन चालूच आहे.तरी या संधीचा सर्व भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. स्पर्धेसाठी शिबिर व सर्व कार्यक्रमात नोंदणी आवश्यक आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी *पुस्तक बँक,पुस्तक दान महादान माणुसकीची भिंत,रक्तदान शिबिर, मोफत रक्त तपासणी,अन्नदान, महिला सक्षमीकरण व शिलाई मशीन वाटप,भटके श्वान व गाई यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बांधणे, बांधकाम कामगारास सेफ्टी कॅप,रिफ्लेक्टर जॅकेट वाटप, वस्तीवरील गरजूंना धान्य वाटप,वृक्षारोपण व स्वच्छता अभियान, योग प्राणायाम शिबिर स्विंग सेना मार्फत मुदगुल प्रशिक्षण,ज्येष्ठ नागरिकांसाठी काठी,चष्मा,वॉकर वाटप, महिलांसाठी कार्यक्रम,कामगारांचा सत्कार, मूलभूत प्रश्नावर भव्य देखावा,आरोग्य शिबिर, वैद्यकीय प्रथमोपचार व शालेय विविध स्पर्धा, डिझेल व पेट्रोल स्टिकर चे लोकार्पण,आधार केवायसी, आयुष्मान कार्ड,आभा कार्ड अशा विविध शासकीय योजना* आयोजित केले आहे.यावर्षीही असलेल्या कार्यक्रमात असे बरेच काही कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी आपले नाव नोंदवून सहभाग घ्यावा.*यावर्षीच्या कार्यक्रम घेण्यासाठी स्पॉन्सर्सची आवश्यकता आहे तरी इच्छुकांनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा*.
या गणेशोत्सवात पुस्तक दान अभियान राबवुन,माणुसकिची भिंत उभारून नवाच आदर्श निर्माण केला आहे.आपल्या गरजेच्या नसलेल्या पुस्तक व वस्तु या ठिकाणी ठेउन जाव्यात आणि आपल्या गरजेची वस्तु असेल तर खुशाल घेउन जावी… *नको असेल ते द्या…हवे असेल ते घेऊन जा…* एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ अश्या प्रकारचा हा उपक्रम निश्चित प्रेरणादायक आणि माणूस कि जपणारा आहे.त्यांच्या ह्या उपक्रमास अंबाजोगाई कर गणेश मंडळास साथ नक्कीच देईल. मी तर चाललो माणुसकीच्या भिंतीकडे सोबत तुम्हीही या…….
सरस्वती गणेश मंडळ, गुरुवार पेठ, सरस्वती कॉर्नर, अधिक माहितीसाठी
निलेश मुथा 9422242083
समीर लाटा 9860377304
कुलदीप परदेशी 9422288898
योगेश परदेशी 9420581251
राहुल मोदी 9766627180
अक्षय परदेशी 9404884644
अश्विन परदेशी 8830404156
निलेश परदेशी 9960036936
सर्वच सरस्वती गणेश मंडळाचे सदस्य व पदाधिकारी
सध्या रक्ताची फार आवश्यकता आहे.तरी ह्या गणेश उत्सवात रक्तदान करून वेगळ्या पद्धतीने गणेसउत्सव साजरा करूया,जास्तीत जास्त लोकांनी आपले रक्तदानासाठी नाव नोंदणी करावी. *रक्तदात्यास, व स्पर्धेच्या सर्व विजेत्यास एक छोटीशी भेटवस्तू स्व.प्रकाशचंद सुरज मलजी मुथा प्रतिष्ठान तर्फे ही देण्यात येईल*.