अंबाजोगाई प्रतिनिधी अशोक कोळी:–
अंबाजोगाई तालुक्यातील तटबोरगाव येथील रामप्रसाद पुरी यांची अखिल भारतीय छावा
संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे. छावा संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंबाजोगाई तालुक्यातून देखील रामप्रसाद पुरी यांचे जोरदार स्वागत होत आहे.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेत कार्यरत असलेले रामप्रसाद पुरी यांचे संघटनेतील कार्य पाहून केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने बीड जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून त्यांना लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी लातूर येथे संघटनेचा संवाद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील तट बोरगाव येथील समाज सेवेत अग्रेसर असलेले रामप्रसाद पुरी यांची केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून संघटनेचे कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील ,राधेश्याम पौळ ,संजय राठोड ,जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील बिडवे ,शहराध्यक्ष बालाजी निकम ,राजू नरके ,अरविंद गाडे, सलीम शेख ,सुलतान भाई शेख ,बालाजी भोसले ,सोनेराव शिंदे ,रघुनाथ पवार ,यांच्यासह छावा चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडीच्या कार्यक्रमा वेळी उपस्थित होते.