धानोरा प्रतिनिधी अशोक कोळी:–
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात मांजरा पट्ट्यातील शेतकरी संकटात सापडले असून ता.२७ शनिवारी आणि आज रविवारी पूरस्थिती कायम असल्याने ऊस सोयाबीन इतर पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा कहर थांबत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे ऊस पीक हातून गेले आहेत.
मांजरा पट्ट्यातील आपेगाव तटबोरगाव कोपरा अंजनपुर देवळा अकोला धानोरा या गावातील मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा फटका बसला आहे.मांजरा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असलेल्याने मांजरा नदीच्या पात्रापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत शेती जलमय झाली आहे शेतीला नदीचे स्वरूप आले असून सोयाबीन सोयाबीनच्या वर चार ते पाच फूट पाणी असून अर्ध्याच्या वर ऊस पाण्यामध्ये आहे. पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने जमीन देखील खरडून गेली आहे. उसाचे पीक मुळासह उपटून निघाले आहे. मांजरा पट्ट्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
*शेतीला आली नदीचे स्वरूप*
मांजरा नदी पात्राच्या दीड किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पाणी झाले असून पाण्याचा मोठा प्रवाह शेतातून सुरू आहे. नदीचे पात्र आहे की शेती हे सांगणे कठीण झाले आहे. सोयाबीन पिक चार-पाच फूट पाणी मोठ्या वेगाने वाहत आहे. शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
*प्रवाहात वाहून गेले शेती उपयोगी साहित्य*
मांजरा धरणात पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून मांजरा नदीपात्रामध्ये खूप मोठा विसर्ग सुरू असल्याने मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे पिंकलर पाईप ठिबक पाईप विद्युत पंपाचे बोर्ड सोलर पंपाचे संच आणि शेती उपयोगी इतर साहित्य वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
*जमीन खरडून गेली ऊस भुई सपाट झाला*
मांजरा नदी पात्रात एवढा मोठा विसर्ग सुरू होता की नदीकाठच्या क्षेत्रातील जमीन करून गेली तसेच ऊस देखील मुळासकट उपटून निघाला आहे. सोयाबीन नासून गेले आहे.पूर्ण ऊस शेती भोई सपाट झाली आहे. भुईसपट झाल्याने आणि सोयाबीन पासून शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे.
पूर परिस्थितीने मांजरा काठाचे क्षेत्र आणि अतिवृष्टीने मांजरा पट्ट्यातील सर्वच गावातील सर्वच शेती ऊस सोयाबीन सह इतर पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. गेल्या आठ दिवसापासून पिके पाणी खाली आहेत. शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी . पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत करावी.
केशव नाना ढगे शेतकरी धानोरा खुर्द ता. अंबाजोगाई
आमच्यात तटबोरगाव शिवारातील जमीन खरडून गेल्याने हे खूप मोठे नुकसान झाले आहे ते भरून न निघणारे नुकसान आहे. नदीच्या अलीकडून 500 एकर जमीन आहे. 50 टक्के शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. आमचे खूप मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे. शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान पूर परिस्थितीमुळे झाले आहे. शासनाने तात्काळ मदत करावी.
आशिष शितोळे शेतकरी तटबोरगाव ता. अंबाजोगाई