अंबाजोगाई प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली असल्यामुळे सर्वत्र पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे व नागरीकांचे न भरुन निघणारे नुकसान झालेले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदया यांनी केलेल्या आव्हानानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचा पगार आणि उर्वरीत बाजार समितीच्या स्वनिधीतुन देणगी स्वरुपात आर्थिक मदत करण्यांचा निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष *श्री. राजेश्वर चव्हाण*, व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी या सर्वांनी पुढाकार घेऊन सर्वांचा एकदिवसाचा पगार आणि बाजार समिती स्वनिधी असे एकुण रक्कम रुपये १,००,०००/- पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी या नावाने चेक क्र. ३०१ ०३४ दि.०४/१०/२०२५ रोजी माननीय आ.श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. तसेच
तसेच *माननीय ना. श्री. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय आ. श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांचे अभिष्टचिंतन निमित्ताने* कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाने मार्केट यार्डातील हमाल मापडी या असंरक्षीत कामगाराचा जनता अपघात विमा बाजार समितीने काढून *कै.पंडित अण्णा मुंडे पुण्यस्मरण* या दिवशी *माननीय आ. श्री. धनंजय जी मुंडे साहेब* यांच्या हस्ते व माननीय श्री ॲड. राजेश्वर चव्हाण सभापती व सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थित वाटप करण्यात आले.