
ताज्या घडामोडी
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
दिव्य ज्योती जागृति संस्थेच्या वतीने आंबेजोगाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय श्रीमद देवी भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवचन मालेच्या वेळी इलेक्ट्रिक चा शॉक लागल्याने प्रशांत सुधाकर सोनवणे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या भागवत कथेस गालबोट लागली आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की
गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति परिवार लातूर संस्थेच्या संवर्धन प्रकल्पां अंतर्गत दि.२५/१०/२०२५ ते दि.३१/१०/२०२५ या कालावधीमध्ये अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगना वर भव्य श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले आसुन
श्री आशुतोष महाराजजी यांच्या शिष्या साध्वी अदिती भारती जी यांच्या सुमधुर वाणी मधून भक्तगण या कथेचे श्रवण करत असतानाच आज दुसऱ्या दिवशी
प्रशांत सुधाकर सोनवणे वय वर्ष 21 या युवकांस थ्री फेस इलेक्ट्रिक शॉक लागला व तो दूर फेकल्या गेला या युवकांस तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घालवले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान प्रशांत सोनवणे या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ होत असून या भागवत कथेस एक प्रकारचे गालबोट लागले गेले आहे.
