
*आय एम चे राज्य पदाधिकारी डॉ राजेश इंगोले यांची मागणी.*
अंबाजोगाई प्रतिनिधी
बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी असलेल्या व सध्या फलटण ग्रामीण वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ संपदा मुंडे यांनी पोलीस प्रशासनातील अधिकारी राजकीय पुढारी व आरोग्य सेवेतील वरिष्ठ अधिकारी यांच्या शारीरिक व मानसिक ज्याच्याच कंटाळून हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती.या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन व राजकीय पुढारी यांच्यातील अभद्र युतीमुळे सर्वसामान्य जनतेस व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर मरण्याची वेळ येत आहे.
याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून प्रशासनाने केलेली हत्या आहे त्यामुळे डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांची एसआयटी चौकशी करा.तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालून संबंधित प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, राजकीय पुढार्यांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ राजेश इंगोले यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे.
घडलेल्या प्रकारामुळे कार्यतत्पर वैद्यकीय अधिकारी यांचे मानसिक खच्चीकरण झालेले असून सरकारने बघ्याची भूमिका न घेता दूषी असलेल्या या नराधमांवर त्वरित कायदेशीर कार्यवाही करावी व दोषींना शासन द्यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
सदरील आंदोलनामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई, अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तसेच मार्ड संघटना अंबाजोगाई सहभागी झाले होते.
यावेळी डॉ राजेश इंगोले डॉ नवनाथ घुगे डॉ राहुल धाकडे डॉ सुलभा पाटील डॉ विजय लाड डॉ बळीराम मुंडे डॉ सुनील जाधव डॉ इमरान शेख यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील मार्ट चे पदाधिकारी व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.
