
*अंबाजोगाई पिपल्स बँकेवर ग्राहकांचा विश्वास – चेअरमन राजकिशोर मोदी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या बँकेस ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५ पुरस्कार’ नुकताच घोषित करण्यात आला आहे. या संदर्भात ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनच्या वतीने ही माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांना देण्यात आली आहे. रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण पुणे येथे आयोजित ‘सहकार मंथन-२०२५’ या सहकार परिषदेत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
येथील अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या बँकेने दर्जेदार
बँकींग सेवा देत ६१२ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. नुकतेच बँकेला एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले. यासाठी शहरी सहकारी बँक गटात ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार – २०२५’ ने ही गौरविण्यात आले आहे हे विशेष होय. तसेच आता जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या बँकेस ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५ पुरस्कार’ नुकताच घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सहकार सभागृह, कॉसमॉस सहकारी बँक लि.मुख्य प्रशासकीय कार्यालय, विद्यापीठ रोड, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी आयोजित ‘सहकार मंथन-२०२५’ या सहकार परिषदेत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून सहकार क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्र येऊन अनुभवविनिमय, विचारमंथन व आगामी दिशानिर्देशासाठी धोरणात्मक चर्चासत्रे आयोजित करण्याच्या उद्देशाने ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार मंथन-२०२५’ ही सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सहकारी गृह रचना संस्था, सहकारी दूध उत्पादक संघ व सहकारी साखर कारखाने अशा विविध सहकार क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अंबाजोगाई पिपल्स बँकेने कर्ज वितरणाद्वारे छोट्या उद्योगांना, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांना, सहकारी संस्था तसेच विविध उद्यमशील व्यक्तींना भांडवल उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसाय व उत्पन्न वृद्धीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कर्ज पोर्टफोलिओचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापनातील सक्षम धोरण, आर्थिक पारदर्शकता, वेळोवेळी सभासदांना लाभांश वितरण, तसेच रिझर्व्ह बँकेच्या सर्व वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून अंबाजोगाई पिपल्स बँकेने सुदृढ, विश्वासार्ह व स्थिर आर्थिक संस्थेचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. या आदर्श कार्यपद्धती, सभासद हित संवर्धन आणि सुयोजित आर्थिक व्यवस्थापनाचा अभ्यास करून आपल्या अंबाजोगाई पिपल्स बँकेची ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड-२०२५’ या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी निवड करण्यात आलेली आहे. याबद्दल आपल्या संस्थेस हार्दिक अभिनंदन. असे गौतम कोतवाल (अध्यक्ष, ग्रीन वर्ल्ड, पुणे) यांनी अंबाजोगाई पिपल्स बँकेस कळविले आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई पिपल्स बँकेने पारदर्शक, गतिमान कारभार व तत्पर सेवेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण उत्तम टीमवर्क करून बँकेने सभासद, ठेविदार, ग्राहक आणि हितचिंतक यांची विश्वासार्हता कमावली आहे. यंदा ३० सप्टेंबर २०२५ अखेर बँकेने ६१२ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या प्रगतीचा आलेख आजतागायत उंचावलेला असून यावर्षी २४ मे २०२५ रोजी बँकेच्या स्थापनेस २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिवसेंदिवस बँकेचे कामकाज वाढत आहे, त्यामुळे सभासद, ठेविदारांचा बँकेवरचा विश्वास वाढत आहे. आहेत. सामाजिक बांधिलकीतून पिपल्स बँक आज बँकींग क्षेत्रात कार्यरत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात बँकेच्या मुख्य कार्यालय व दोन विस्तारीत शाखांसह एकूण १८ शाखा कार्यरत आहेत. चालू आर्थिक वर्षात बँकेच्या आणखी ३ नवीन शाखा सुरू झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हे बँकेचे कार्यक्षेत्र आहे. बँकेच्या सर्व शाखा या संगणकीकृत आहेत. यूपीआय ही सुविधा देणारी अंबाजोगाई पिपल्स बँक ही शहरातील पहिली बँक ठरली आहे. आज बँकेचे स्वतःचे अत्याधुनिक डाटा सेंटर आहे. तत्पर, विनम्र आणि दर्जेदार बँकींग सेवा ही बँकेची ओळख आहे. ३० जुन २०२५ अखेर बँकेची सभासद संख्या – १२९३८ एवढी आहे. बँकेकडे ६१२ कोटी एवढ्या ठेवी, भागभांडवल – २० कोटी, तर स्वनिधी- ५० कोटी एवढा आहे. बँकेने तब्बल ३३४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. ३३७ कोटी रूपयांची गुंतवणूक ही केली आहे. बँकेला ३१ मार्च २०२५ अखेर ४ कोटी ७२ लाख रूपयांचा नफा झाला आहे. बँकेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक, विधायक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविले होते हे उल्लेखनीय आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकेने गरूडझेप घेत ६१२ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला. यासाठी बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, वरीष्ठ अधिकारी, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट यांनी केलेल्या उत्तम टीम वर्कचेच हे फलित आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना एखाद्या बँकेने केंद्र सरकार, आरबीआय, सहकार खाते आणि बँकींगचे सर्व नियम पाळून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकींग सेवा, विविध सुविधा उपलब्ध करून देत आर्थिक वर्षात आपला एनपीए शुन्य टक्के ठेवण्याचा, कमीत-कमी राखण्याचा अटोकाट प्रयत्न केला पाहिजे, यासाठीच काटेकोरपणे काम करीत बॅंकेकडून एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले जाते. अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या आपल्या बँकेने ही आपला एनपीए हा कमीत-कमी राखण्याचा, ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न प्रत्येक आर्थिक वर्षांत केलेला आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकेने एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले याची दखल घेत आशिया खंडातील सहकारी बँकिंगसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले भारत कॉपरेटीव्ह बँकिंग समितीच्या वतीने नुकतेच अंबाजोगाई पिपल्स बँकेला एनपीएचे सर्वोत्तम व्यवस्थापन करणारी शहरी सहकारी बँक या गटात ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले ही गौरवपूर्ण बाब आहे. पुढे बोलताना बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या आपल्या बँकेने सुरूवातीपासून एनपीए कमीत-कमी राखला आहे. सर्वच शाखांतून बँकेमार्फत ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एईपीएस, तसेच युपीआय सारख्या अद्ययावत सुविधा देखील पुरविण्यात येत आहेत. बँकींग विषयक सर्व आधुनिक सेवा, सुविधा, नवे तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार बँक सभासद आणि ग्राहकांना पुरविते. यापूर्वी ही बँकेस विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सर्वांगिण प्रगती आणि विकासात बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, सर्व संचालक श्री.वसंतराव चव्हाण, ऍड.विष्णुपंत सोळंके, अरूण काळे, सुरेश मोदी, ऍड.सुधाकर कराड, श्रीमती वनमाला रेड्डी, संकेत मोदी, सौ.स्नेहा हिवरेकर, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, तज्ज्ञ संचालक सुनिल राजपुरोहित, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक, बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद व पिग्मी एजंट यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व योगदान आहे. अशी माहिती चेअरमन मोदी यांनी दिली. अंबाजोगाई पिपल्स बँकेस ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५ पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल सर्वस्तरांतून बँकेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
*अंबाजोगाई पिपल्स बँकेवर ग्राहकांचा विश्वास :*
अंबाजोगाई पिपल्स बँकेने आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच बँक सातत्यपूर्ण सर्वंकष कामगिरी करीत वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांच्या बॅंकींग गरजा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. अंबाजोगाई पिपल्स ही ग्राहकांची आपली हक्काची व त्यांचे हित जपणारी ही बँक असून बँकेने ६१२ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला तसेच एनपीएचे व्यवस्थापन ही सर्वोत्तम केले याचा आपणा सर्वांनाच आंनद आहे. सर्वांनी बँकेच्या अभिनव सेवांचा आणि सुविधांचा पूर्णपणे उपयोग करावा असे आवाहन करून यापुढील काळात ही अंबाजोगाई पिपल्स बँक सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक आणि हितचिंतक या सर्वांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही देतो.
*- राजकिशोर मोदी*
(चेअरमन, अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक)
