
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) कडून ‘बोंब मारो आंदोलन’ करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक कामात दिरंगाई होत असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) कडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलक झळकावत, बोंब मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) चे युवा तालुकाध्यक्ष प्रमोद दासुद यांनी दिली आहे.
या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) चे युवा तालुकाध्यक्ष प्रमोद दासुद यांनी सांगितले की, आम्ही आंबेडकरी अनुयायांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई (जि.बीड.) यांना २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निवेदन दिले होते. सदरील निवेदनात संदर्भ – १) मौजे बर्दापूर (ता.अंबाजोगाई जि.बीड) येथे दिनांक २८/१०/२०२० रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना तसेच २) दिनांक २४/१०/२०२५ च्या निवेदनानुसार. मौजे बर्दापूर, ता.अंबाजोगाई, जि.बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक कामात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल संबंधित अभियंता यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर अनुसुचित जाती/जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करणे बाबत निवेदन दिले होते. या निवेदनात मौजे बर्दापूर, ता.अंबाजोगाई, जि. बीड येथे दिनांक २८/१०/२०२० रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही जातीवादी समाज कंटकाकडून विटंबना झाली होती. सदरील घटनेनंतर सर्व भिम सैनिकांनी आंदोलने, उपोषणे केली व दिनांक २१/०१/२०२२ रोजी शासनाने सदरील स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला व ते काम खुल्या निविदाद्वारे संबंधित गत्तेदारास दिले. आजतागायत दिनांक २५/११/२०२५ पर्यंत स्मारकाचे काम अपूर्ण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता हे जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून स्मारक उभारण्यास दिरंगाई करीत आहेत. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर अनुसूचित जाती/जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मौजे बर्दापूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिनांक ०५/१२/२०२५ रोजी बोंब मारो आंदोलन करण्यात येत आहे. असा इशारा प्रमोद दासुद, भगिरथ कोरडे, विलास वाघमारे, राहूल गंडले यांनी निवेदनातून दिला होता. निवेदनाच्या प्रतिलिपी माहितीस्तव कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, तहसिलदार, पोलीस उपअधिक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन बर्दापूर यांना देण्यात आलेल्या होत्या. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई यांनी आंदोलकांना लेखी स्वरूपात कळविले आहे की, मौजे बर्दापूर (ता.अंबाजोगाई, जि.बीड) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थापना आणि नुतनीकरण करणे हे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. स्मारक तयार करण्याचे काम पुर्ण करण्यात आलेले असून, स्मारक व उर्वरीत कामे हे दिनांक ३१ मार्च २०२६ पुर्वी पुर्ण करण्यात येतील, तरी आपणांस विनंती करण्यात येते की, दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणारे आंदोलन करण्यात येऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती ही उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई यांनी केली होती. तरी परंतु, आंबेडकर प्रेमी नागरिकांनी लक्षवेधी बोंब मारो आंदोलन केले. या आंदोलनात प्रमोद दासुद, भगिरथ कोरडे, विलास वाघमारे, राहूल गंडले, महादेव गंडले, अनिल सावंत, सुरेश कांबळे, विलास भागवत, भिमा कोरडे, किरण गंडले, मिलिंद गांधले, महेंद्र गंडले, रोहन वाघमारे, धैर्यशील गंडले, पांडुरंग गंडले, प्रेम गायसमुद्रे, संदीपान गायकवाड, शुभम साळवे, गौतम सरवदे, दत्तात्रय क्षीरसागर, गोविंद टेकाळे, प्रशांत भालेराव, विकास जोगदंड, विश्वास जोगदंड, वाल्मिक जोगदंड, गणेश टेकाळे, सतिश घोडके, दिपक जोगदंड, शंकर जोगदंड, युवराज वाघमारे, भैय्यासाहेब, योगेश, बाळू भागवत, राघू भागवत, धम्मपाल भागवत आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (अ) आणि रिपब्लिकन बहुजन सेनेचे कार्यकर्ते ही सहभागी झाले होते.
