
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवीट तलावात आज गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. समितीतील पंचायत सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे (वय ६४) हे नेहमीप्रमाणे तलावात पोहण्यासाठी गेले असता अचानक बेपत्ता झाले आहेत.
मिळालल्या माहितीनुसार, विश्वनाथ बुरांडे हे दररोज सकाळी पोहण्यासाठी काळवीट तलावावर जात असत. आज सकाळीही त्यांनी नित्यनियमानुसार कपडे आणि गळ्यातील माळ काढून ठेवली आणि तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र बराच वेळ होऊनही ते पाण्याबाहेर न आल्याने सोबतच्या लोकांच्या ही बाब लक्षात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अंबाजोगाई नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.सध्या नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून तलावाच्या पाण्यात बुरांडे यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परळी येथून रेस्क्यू टीमला देखील बोलावण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
