
*लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.पाटील यांचा ह्रद्य सत्कार*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
अंबाजोगाई शहरात बुधवारी एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते व माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोदींसह, मान्यवर व लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.पाटील यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील हे अंबाजोगाई शहरात बुधवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते व माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोदी परिवार आणि लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.बाबासाहेब पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार संजयभाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नेते राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, डॉ.जाधव, माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले, नवनिर्वाचित नगरसेवक हाजी इस्माईल गवळी, महेश लोमटे, दिनेश भराडिया, अमोल लोमटे, सय्यद ताहेरभाई, आकाश कराड, नजीर (मुन्ना) पठाण, ऍड.विकास काकडे, अकबरखाँ पठाण, मोईनभाई शेख, रौफभाई बिल्डर, भिमसेन लोमटे यांच्यासह माजी नगरसेवक खालेदभाई चाऊस, गफारभाई खान, पंडितराव हुलगुंडे, अश्विन सावंत, दौलत मीरखाँ, प्रविण देशमुख आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
