
*स्वच्छता, पाणी पुरवठा नियमित करून पथदिवे सुरू करा – या मागण्यांसाठी लोक विकास महाआघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील नागरिकांना स्वच्छता, पाणी पुरवठा व दिवाबत्ती या मुलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी लोक विकास महाआघाडीच्या वतीने शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लोक विकास महाआघाडीच्या वतीने विविध ६ मागण्यांसाठी शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मांजरा धरण, काळवटी साठवण तलाव यावर्षी ही १०० टक्के भरलेले आहेत. असे असताना ही अंबाजोगाई शहरातील सर्व प्रभागांमधील नागरिकांना दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. तोही अपुरा, विस्कळीत, अनियमित आहे. पाणी पुरवठा करण्याचे कोणतेही नियोजन नाही. तसेच टाइमटेबल ही पाळले जात नाही. त्यामुळे अंबाजोगाई शहरातील सर्व प्रभागांमधील नागरिकांना स्वच्छ, मुबलक व नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा. तसे नियोजन नगरपरिषदेमार्फत तात्काळ करण्यात यावे., शहरातील सर्व प्रभागांमध्ये रस्ते, नाल्या, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होवून अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. तेव्हा नियमीतपणे स्वच्छता होते का..?, घंटागाड्या नियमीतपणे व नियोजनबद्ध पद्धतीने शहरात सर्वत्र फिरतात की, नाही याकडे नियंत्रण ठेवावे, त्यावर जीपीएस ट्रॅकर बसवावे., शहरातील सर्व प्रमुख चौक, रहदारीचे रस्ते व प्रभागातील नगरपरिषदेचे बंद असलेले पथदिवे तातडीने दुरूस्त करून सुरू करावेत. त्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवावेत. जेणेकरून अंधाराच्या खाईत लोटले गेलेले शहर प्रकाशमान होईल., नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार यांचे पगार नियमितपणे होत नाहीत. ते नियमितपणे केले जावेत. तशी आर्थिक तरतूद तात्काळ करण्यात यावी., बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती करणे, काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी तात्काळ पाठवावा आणि रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करा, कारण, भटकी कुत्री केवळ चावतात असे नाही, तर ते गंभीर अपघातांनाही कारणीभूत ठरतात. स्स्ते भटक्या कुत्र्यांपासून मुक्त आणि मोकळे ठेवावे लागतील कारण, मागील काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहरातील अनेक नागरिक आणि मुलांना भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेवून गंभीर जखमी केले आहे. तरी तात्काळ भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा मागण्यांचा समावेश आहे. सदरील विषयांवर आपण तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. आणि अंबाजोगाईतील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा याप्रश्नी लोक विकास महाआघाडीला जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा सदरील निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर निवेदक राजकिशोर मोदी (प्रमुख – लोक विकास महाआघाडी.), पृथ्वीराज साठे, (माजी आमदार), बबनराव लोमटे (माजी उपनगराध्यक्ष), सय्यद ताहेरभाई (गटनेता – लोक विकास महाआघाडी, नगरपरिषद, अंबाजोगाई.), नगरसेवक हाजी इस्माईल हिरू गवळी, दिनेश मोतीलाल भराडीया, महेश बाळासाहेब कदम, महेश बालासाहेब लोमटे, ऍड.विकास रामकृष्ण काकडे, मालू भगवानराव जोगदंड, आकाश जिवनराव कराड, राजपाल संभाजीराव जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, सौ.दिपाताई बबनराव ऊर्फ दाजीसाहेब लोमटे, शेख शमीम शेख रहीम, बशीरा शफीक सय्यद, नाजनीन बेगम अकबरखाँ पठाण, शेख शिरीन अशफाक, सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे, सौ.संगिताताई दाजीसाहेब लोमटे, सौ.रेखाताई विलासराव जाधव आणि सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरील निवेदन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी स्विकारले. यावेळी लोक विकास महाआघाडीचे अमोल लोमटे, बंडू भारजकर, अकबर पठाण, जफरभाई शेख, रौफभाई बिल्डर, खलीलभाई जाफरी, रफिक गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
*अंबाजोगाईकरांना मिळाव्यात मुलभूत नागरी सुविधा – राजकिशोर मोदी*
अंबाजोगाई शहरातील सर्व प्रभागांमधील नागरिकांना अपुरा, विस्कळीत, अनियमित आहे. पाणी पुरवठा करण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे स्वच्छ, मुबलक व नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा. शहरात आवश्यक स्वच्छता करावी, बंद पथदिवे तातडीने दुरूस्त करावेत. नगरपरिषद कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार यांचे पगार नियमितपणे केले जावेत, बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती, काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी तात्काळ पाठवावा आणि रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करा, सदरील विषयांवर आपण तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. अंबाजोगाईकरांना मुलभूत नागरी सुविधा मिळाव्यात एवढेच आमचे म्हणणे आहे.
*जनतेच्या समस्यांची सोडवणूक करा – माजी आ.पृथ्विराज साठे*
अंबाजोगाई शहरातील जनता सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. सुरळीत पाणी पुरवठा नाही, नियमित स्वच्छता नाही, पथदिवे बंद आहेत. भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिक परेशान आहेत. अंबाजोगाईतील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. तरी या संदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी.
