अंबाजोगाई प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अंतर्गत कार्यरत वैद्यकीय कक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांची नियुक्ती करण्यात आल्याने डॉक्टर इंगोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी नुकताच संपन्न झाला. मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेनेही मागील तीन-चार वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श पत्रकार संघ म्हणून अंबाजोगाईची निवड केल्यामुळे या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्या साठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय कक्ष प्रमुख व सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांना विशेष निमंत्रित केले होते. यावेळी त्यांच्या समवेत मराठी पत्रकार परिषदेचे हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर, प्रशांतजी लाटकर, पुनमचंद परदेशी, प्रशांत मस्के यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉक्टर राजेश इंगोले यांनी मागील तीन वर्षात अंबाजोगाई शहरातील पत्रकार बांधवांच्या आरोग्यासाठी विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माननीय एस एम देशमुख यांनी अंबाजोगाई चा हा पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्याच्या उद्देशाने डॉक्टर राजेश इंगोले यांची वैद्यकीय कक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड जाहीर केली असून या निवडीचे पत्र लवकरच त्यांच्या कडे सुपूर्त केले जाईल असे एस एम देशमुख यांनी सांगितले.
डॉ राजेश इंगोले हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्षही व केंद्रीय मध्यवर्ती कार्यकारणी सदस्यही आहेत आहेत. तसेच त्यांनी विविध शासकीय समित्यावर काम केले आहेव अंबाजोगाई नगर परिषदेत शिक्षण सभापती म्हणून कार्य केले आहे.
राज्यातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच सर्व शाखा स्तरावर वैद्यकीय कक्ष प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय कक्षाच्या कार्याध्यक्षपदी डॉक्टर राजेश इंगोले यांची नियुक्ती करण्याचे घोषित केल्यानंतर डॉक्टर इंगोले यांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरणजी नाईक, शरद पाबळे, परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत अष्टीवकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे, प्रदेश सदस्य सुभाषची चौरे, बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंखे, रवी उबाळे, विलास डोळसे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर, निमंत्रक अभिमन्यू घरत, ज्येष्ठ पत्रकार मित्र अनिलजी महाजन, अविनाश मुडेगावकर, प्रशांत बर्दापूरकर, रवी मठपती रमाकांत पाटील, रमाकांत उडानशिव, प्रकाश लखेरा, अभिजीत गाठाळ, अभिजीत गुप्ता, परमेश्वरजी गीते, दिलीप अडसूळ, अतुल जाधव, रणजित डांगे, रवी मठपती, शिवकुमार निर्मळे, प्रदीप तरकसे, रोहिदास हातागळे, महादेव गोरे, दादासाहेब कसबे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे एम एम कुलकर्णी, प्रशांतजी लाटकर, वीरेंद्र गुप्ता, गोविंद खरटमोल, राहुल देशपांडे, अशोक दळवे, सलीम गवळी, व्यंकटेश जोशी, ज्ञानेश मातेकर, संजय रानभरे, गोविंद जाधव, गणेश चांगिरे, परमेश्वर वैद्य, पुनमचंद परदेशी, प्रशांत मस्के, मोहम्मद फैजान, शेख मुशीर बाबा, श्रीकांत कदम, उत्तरेश्वर शिंदे यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
