अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथील कृषी चंद्रमा अग्रो प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून हरभरा तूर खरेदी केंद्र सुरू झाले आहे
कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत नाफेड मार्फत मॉडेल खरेदी केंद्र म्हणून कृषीचंद्रमा ॲग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड ममदापूर पा. ता. अंबाजोगाई जि.बीड ला नाफेड मार्फत थेट मंजुरी मिळाली आहे. परिसरातील शेतकऱ्याच्या हरभरा मालासाठी हमीभाव नोंदणी सुरू झाली आहे. तुरीची नोंदणी आणि खरेदी सुरू आहे. तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धानोरा खुर्द परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी चंद्रमा प्रोडूसर कंपनी कडे नोंदणी करावी असे आव्हान संचालक सचिन मामडगे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या हरभरा शेतीमाल हमीभाव 5875 क्विंटलने खरेदी करण्यात येणार आहे तर तुर हमीभाव 8000 क्विंटलने खरेदी होणार आहे.
शेतकऱ्यांना आधार बेसवर माल खरेदी केल्यापासून 48 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. तूर खरेदी केंद्र आणि हरभरा नोंदणी सुरू झाली आहे.खरेदी केंद्र सुरू झाल्याने झाल्याने धानोरा खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कृषी चंद्रमा ऍग्रो प्रोडूसर कंपनी नांदडी येथे तुरीची हमीभावाने खरेदी सुरू झाली हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. हरभरा आणि तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत हरभरा तर
24 मार्च पर्यंत तूर नोंदणी करता येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी. शेतकऱ्यांना तूर हरभरा खरेदी केल्यापासून अवघ्या 48 तासात खात्यावर होणार आहेत. तरी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून तूर हरभरा कृषी चंद्रमा ग्रुप सर कंपनी यांच्याकडे शासनाच्या हमीभावाने विक्री करावा असे आव्हान कृषी चंद्रमा अग्रो प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून संचालक सचिन मामडगे यांनी केले आहे.
