अंबाजोगाई प्रतिनिधी :-
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धावडी गावातील सुरवसे वस्ती येथे पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी ग्रामपंचायत धावडीने विकासात्मक पाऊल उचलले आहे. सरपंच आशा काशिनाथ घुले यांच्या प्रयत्नातून धावडीगाव मध्ये या काम आगोदर च नळ योजना सुरू केलेली आहे सध्या गावांमध्ये मुबलक पाणीपुरवठा सुरळीत आहे पण गावातील सुरवसे वस्तीवर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी डोंगर पिंपळा येथील निळकंठेश्वर तलावातून सुरवसे वस्तीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात सुरवसे वस्तीवर पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे वस्ती वरील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन सरपंच आशा काशिनाथ घुले यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाईपलाईन योजनेचे काम हाती घेतले. सध्या या कामाला वेगाने सुरुवात झाली असून लवकरच सुरवसे वस्तीतील नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमामुळे सुरवसे वस्तीवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच आशा काशिनाथ घुले सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या कामामुळे उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टळण्यास मदत होणार असल्याने सुरवसे वस्तीतील नागरिकांनी सरपंच आशा काशिनाथ घुले व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
