अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आता स्वतःच्या स्वतंत्र व प्रशस्त प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत असून, येत्या ६ एप्रिल २०२६ पासून नवीन ठिकाणी नियमित कामकाज सुरू होणार आहे. लातूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत, सेंजारी (मौजे लोखंडी सावरगाव) येथे स्व. विमलताई मुंदडा आरोग्य संकुलाजवळ ही अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली आहे.सध्याचे कार्यालय शहरात मर्यादित जागेत कार्यरत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, परवाने, कर भरणा यांसारख्या कामांसाठी मोठी गर्दी होत होती. या पार्श्वभूमीवर नवीन इमारतीत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन कार्यालयात प्रशस्त प्रतीक्षालय, संगणकीकृत सेवा सुविधा, स्वतंत्र काउंटर, पार्किंग व्यवस्था तसेच नागरिकांसाठी अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामकाज अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ६ एप्रिल २०२६ पासून वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, परवाने, कर भरणा आदी सर्व कामांसाठी लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयातच भेट द्यावी. जुन्या कार्यालयात ही सेवा उपलब्ध राहणार नाही.

नवीन इमारतीमुळे केवळ प्रशासकीय कामकाज सुलभ होणार नाही, तर नागरिकांना वेळेची बचत होऊन सेवा अधिक गुणवत्तापूर्ण पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पुढील सर्व कामकाजासाठी नवीन कार्यालयाचा वापर करावा, असेही आवाहन
