Amravati

पोलीसदलात कार्यरत बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार, नराधमाने ‘खाकी’ची लाज घालवली

अमरावती प्रतिनिधी:—

    अमरावती शहरात पोलीस दलात कार्यरत असलेल्या बापानेच पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आसुन या प्रकरणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस पित्याने सलग वर्षभर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार एका 24 वर्षीय तरुणीने अमरावतीच्या राजापेठ पोलिसांत केली आहे. या खळबळजनक प्रकारानंतर नात्याला काळीमा फासणाऱ्या पोलीस बापाविरोधात बलात्कार,विनयभंग आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलीवर अत्याचार होत असताना आरोपी बाप हा अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीने 4 जून रोजी सकाळी सात वाजता पीडित मुलीला घाणेरडा स्पर्श केला. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

लहाणपणीच लैंगिक जवळीक साधण्याचा नराधमाचा प्रयत्न

तरुणी २०१५ साली आठवीत असताना आरोपीने लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून आरोपीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. या प्रकारानंतर ही संपूर्ण माहिती आईला सांगितली.

मुलगी आणि बायकोला जीवे मारण्याची धमकी

शारिरीक अत्याचार केल्याची माहिती बाहेर गेली तर सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी आरोपी बापाने तरुणी आणि तिच्या आईला दिली होती. अमरावती शहरातील या धक्कादायक प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893837
error: Content is protected !!