आष्टी

समाजाला संत गाडगेबाबा यांच्या विचारांची गरज – डॉ कैलास वायभासे

देऊळगाव प्रतिनिधी: – आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या पाठीमागे न लागता अभ्यास करावा. मोबाईल हे जेवढे फायद्याचे आहेत तेवढे त्याच्यापासून तोटे ही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा. विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उच्च अधिकारी बनावे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे. आजच्या समाजाला समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन सोमवारी (ता २७) अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कैलास वायभासे यांनी केले. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा यांचे संयुक्त विद्यमाने चिंचोली (ता आष्टी) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर धलावडे, बबन दहातोंडे, किशोर अंधारे, शरद जाधव, शेख मुनीर फौजी, सुधीर ठाणगे, दिनेश जाधव, श्रीमती थोरवे, हौसराव भालेराव, हरिश्चंद्र गाडे, माजी सरपंच महादेव इथापे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ उस्मान खान पठाण यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा.निसार शेख, डॉ.रमेश खिळदकर, प्रा विवेक महाजन, प्रा आजिनाथ गिलचे, प्रा राजेंद्र मिसाळ, प्रा आतेश बनसोडे, प्रा ज्ञानेश्वर अम्रीत, प्रा डॉ बोराडे बाळू, प्रा राजू शेलार, प्रा शबाना शेख, प्रा रत्नमाला तरटे, प्रा सुभाष मोरे, प्रा ज्ञानदेव बोडखे, प्रा गोरक्षनाथ वाळके, प्रा सतीश तागड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ संजय झांजे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा गहिनीनाथ एकशिंगे यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!