भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर कारवाई करा कुत्रीचे नाव रमा ठेवल्याने भावना दुखावल्या
आष्टी प्रतिनिधी : बीड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शंकर देशमुख यांनी आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव रमा ठेवले असून या कुत्रे बरोबर फोटो काढून समाज माध्यमांवर स्टेटस ठेवल्याने दलित बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी यासाठी दलित बांधवांनी आष्टी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दलित बांधवांनी म्हटले आहे की, जातीवादी हेतूने पाळीव कुत्रीचे नाव “रमा” ठेवुन तिच्या सोबत फोटो काढून समजमध्यामावर स्टेटस ठेवल्याने दलित बांधवांच्या भावना दुखावले आहे. त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर कडक कारवाई कण्यात यावी अशी मागणी दलीत बांधवांनी निवेदनाद्वारे आष्टीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.