आष्टी

आ.सुरेश धस यांचे विरुद्ध गरळ ओकणारे भाऊसाहेब लटपटे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा वंजारी समाज बांधवांचे आष्टी पोलीस स्टेशन येथे निवेदन

आष्टी प्रतिनिधी :
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ. श्री सुरेश रामचंद्र धस यांची बदनामी करणाऱ्या भाऊसाहेब लटपटे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आष्टी तालुक्यातील वंजारी समाजातील समाज बांधवांनी आष्टी पोलीस स्टेशन येथे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की,

आष्टी विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आमदार सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी विजय मिळवलेला असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते भाऊसाहेब लटपटे त्यांची सतत बदनामी करणारे वक्तव्य करत आहेत त्यांच्याविरुद्ध गरळ ओकत आहेत.

वास्तविक पाहता भाऊसाहेब लटपटे हेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांचेवर आत्तापर्यंत आष्टी आणि अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले असून त्यांना एका गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने आमदार सुरेश धस यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीवर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी करू नये भाऊसाहेब लटपटे यांनी त्यांच्या लायकीप्रमाणे वक्तव्य करावीत भाऊसाहेब लटपटे हे वेळोवेळी यूट्यूब चैनल आणि जमेल त्या ठिकाणी आमदार सुरेश धस यांची बदनामी होईल असे वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी भाऊसाहेब लटपटे यांच्या वक्तव्यातून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे अशा जातीजातीत भांडण लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती निवेदन करण्यात आली असून भाऊसाहेब लटपटे यांनी जनतेची कोणती कामे केली आहेत हे सांगावे स्वतः गुंड प्रवृत्तीचे असून आमदार सुरेश धस यांच्यासारख्या पाच टर्म आमदार असलेल्या व्यक्तींवर त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी हे योग्य नाही भाऊसाहेब लटपटे यांनी अगोदर आपला डीएनए तपासला पाहिजे इतक्या खालच्या पातळीवरील टीका करणे हा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही भाऊसाहेब लटपटे म्हणजे वंजारी समाज नसून त्यांनीही तसेच समजू नये आष्टी तालुक्यातील वंजारी समाज हा पूर्णपणे आमदार सुरेश धस यांच्या मागे ठाम उभा असून या भागामध्ये केवळ आमदार सुरेश धस यांनी विकास कामे केलेली आहेत त्यामध्ये पाथर्डी सरहद्द ते पाटसरा रस्ता डांबरीकरण कापशी येथील साठवण तलावाची उंची वाढवणे तसेच अनेक गावातील रस्ते शाळा, बांधकामे, अंगणवाडी, बांधकामे अनेक गावचे पाणीपुरवठा योजना ही कामे आमदार सुरेश धस यांनीच केलेली आहे.

आजवर यापूर्वी कोणत्याही आमदाराने न केलेली कामे ही आमदार सुरेश धस यांनी केलेले आहेत आणि यापुढे येथे करणार आहेत असा आम्हाला विश्वास असून यामुळे आमदार सुरेश धस यांची बदनामी खपवून घेणार नाहीत हे भाऊसाहेब लटपटे यांनी ध्यानात घ्यावे असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे या समाज बांधवांमध्ये आष्टी दूध संघाचे चेअरमन आजिनाथ सानप, दूध संघ माजी चेअरमन दूध एन टी गर्जे, माजी चेअरमन आत्माराम फुंदे, जि. प.सदस्य रावसाहेब शिरसाठ, माजी संचालक भगवान सांगळे, माजी सरपंच उद्धव गर्जे,दिलीप गर्जे, सुंदरलाल गर्जे,आश्रुबा गोल्हार, विठ्ठल गर्जे, बाळासाहेब वणवे, नारायण वनवे,बबन शेकडे,माजी सरपंच काका गर्जे,शेषराव गर्जेफौजी, अक्षय गर्जे, सारूख मामा,एन व्ही नागरगोजे,माणिक दहिफळे, वसंत मिसाळ,मोहन आघाव, इंद्रजीत गर्जे, बबन शेकडे, अशोक मिसाळ, बाळासाहेब बाबूलाल सांगळे, आदीसह आष्टी तालुक्यातील वंजारी समाज बांधवांचा मोठया प्रमाणात समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!