शेतकऱ्यांनी गाळ टाकून जमिनीची सुपीकता वाढवावी..प्रकल्पाचा पाणी साठा देखील वाढेल–आ. सुरेश धस
शेतात गाळ टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी थेट अनुदान जमा होणार..
— जिल्हाधिकारी अविनाश पाठक
आष्टी (प्रतिनिधी)
रूटी मध्यम प्रकल्प परिसरातील शेतकरी हा अत्यंत कष्टाळू आहे. या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत केळसांगवी या गावी विजया घुले यांनी पतीच्या निधनानंतर अत्यंत कष्ट करून शेती तून उत्पन्न काढले आहे त्यांनी सफरचंद आणि खजुराचा प्रयोग केलेला आहे.तसेच ड्रॅगन फ्रुट मधून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे त्यामुळे रूटी प्रकल्पाची उंची वाढवायची आहे असा माझा उद्देश असून या तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यास शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारणार असून गाळ काढल्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मृदा व जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता आमले,आष्टी तहसीलदार वैशाली पाटील,अंबेजोगाई मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया,डॉ.आंबेडकर फोरमचे यशवंत खंडागळे,प्रविण वारे,सरपंच अजित घुले,माजी सरपंच महादेव पडोळे,माजी सरपंच गंगाधर पडोळे, बाळासाहेब बोराडे,उपसरपंच माऊली पडोळे, अंगद पडोळे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.म्हणाले,
परिसरातील विहीरींचे पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे हा मोठा फायदा आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या रूटी प्रकल्पाची मशिनरी बंद पडू नये यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नये मी देखील मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन आणखी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांनी समजूतदार म्हणून दाखवावा गाळपेरा करणाऱ्या शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे पाणी सोडून देऊन त्यांनी रस्ते अडवण्याचे काम करू नये सुरुवातीला या तलावातील चार फूट उंचीची चळ कडू त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. या तलावातील आणखी साडेसहा लक्ष क्युबिक मीटर गाळ काढू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून ते म्हणाले की,शेतीबरोबरच यापुढे सामूहिक दूध व्यवसायासाठी सामूहिक गाय आणि गोठे असे संकल्पना आपली असून त्यासाठी आंधळेवाडी शिवारातील आपल्या गाय गोठ्याला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक म्हणाले की, तलावातील गाळ काढण्याच्या कामाला आमदार सुरेश धस यांचा फार मोठा पाठपुरावा होता आणि ते अत्यंत योग्यच असून कारण तलावातील गाळ जमिनीवर टाकून जमिनीचा पोत वाढवणे ही महत्त्वाची बाब आहे.त्यातून उत्पादन खर्च बचत होत असते हा गाळ म्हणजे सोन आहे. शेतकऱ्यांनी गाळ घेऊन शेतात टाकल्यास अवनी अॅप द्वारे त्यावर नोंदणी होणार असून 1000 क्युबिक मीटर्सला हेक्टरी शासनाचे अनुदान मिळणार आहे.अनुदान हे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. याची शासन पातळीवर आम्ही खबरदारी घेत आहोत आणि शेतकऱ्यांनी खर्च केल्यास दोन-तीन वर्षात उत्पन्न वाढल्यामुळे हा खर्च निघून जाणार आहे आणि जमिनीचा दर्जा ही कायमस्वरूपी चांगल्या पिक देणारा राहणार आहे. रुटी प्रकल्पातील या आठवड्यामध्ये आपण 60 टक्के उद्दिष्ट साध्य केल्यास आणखी एक लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू त्या शुभारंभ प्रसंगी देखील आपण पुन्हा उपस्थित राहू असे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी केळसांगवी,पिंप्री आष्टी,रुटी इमनगाव इत्यादी गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.