पालकमंत्री ना अजित पवार यांच्या उपस्थिती मधील डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची मुंडे, सुरेश धस, सोनवणे एकमेकांत भिडले
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठकीत संतोष देशमुख हत्या प्रकरण ते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशतवादी या मुद्द्यांवरून बैठकीत थोडी बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे, भाजपचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर तसेच प्रकाश सोळंके देखील उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीनंतर आता विविध प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येऊ लागल्या आहेत. यावेळी बीड जिल्ह्यात आणि कामांना चुकीच्या पद्धतीने मान्यता देण्यात आल्या आहेत. निधी उपलब्ध नसतानाही अनेक कामांना मान्यता दिल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली. तसेच बीडच्या बदनामीवरून बीपीसीच्या बैठकीत थोडी बाचाबाची झाल्याची माहिती त्यांनी दिली. यात धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशतवादी तसेच मागील काळातील घटनांवरून शाब्दिक चकमक झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याची चर्चा आता सर्व दूर सुरू झाली आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना बजरंग सोनवणे म्हणाले की, दहशतीच्या मुद्यावरून डीपीसीच्या बैठकीत कुणी एकाला टार्गेट करत असेल तर आम्ही देखील त्याची बाजू मांडू. बीडची बदनामी करू नका, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. यावरून काहीसा गोंधळ बघायला मिळाला. तसेच ज्यांनी ज्यांनी बीड जिल्ह्याला बदनाम केले आहे. खंडणी प्रकरण, मटका प्रकरण, तसेच सध्याची सत्य परिस्थिती आ