*महावितरणाचा कणा हा जनमित्र आहे :- संदीप चाटे (कार्यकारी अभियंता )*
*अंबाजोगाई महावितरण विभागातर्फे ‘लाईनमन डे‘ उत्साहात साजरा*
*बीड /अंबाजोगाई प्रतिनिधी*:-
“जनमित्र कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा म्हणून संगीत रजनी व सुरूची भोजनाचे आयोजन”
०४ मार्च हा ‘लाईनमन डे‘ म्हणून साजरा केला जातो,याच ‘लाईनमन डे‘ चे औचित्य साधून सर्व जणमित्रांना कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा म्हणून संदीप चाटे साहेब यांच्या संकल्पनेतून महावितरण अधिकाऱ्यांच्या वतीने संगीत रजनी व सुरुची भोजनाचे आयोजन अंबाजोगाई येथील मानवलोक ॲड भगवानदासजी लोहिया कल्याण मंडपम् या प्रशस्त परिसरात आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अंबाजोगाई महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री संदीप चाटे साहेब हे होते, तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री बोबडे साहेब, श्री कानडे साहेब, श्री दत्ताभाऊ गुट्टे साहेब, श्री गीते सर, श्री जाधव सर ,कराड सर, नाकाडे सर ,आमले सर, मुंडे सर ,महिला प्रतिनिधी सहाय्यक अभियंता श्री नागरगोजे मॅडम, लेखा विभागाचे काळे सर ,किशोर ढगेसर ,देशमुख मॅडम व इतर अधिकारी कर्मचारी लाईनमन डे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता’ या प्रार्थनेने झाली. नंतर प्रत्येक शाखेतील प्रत्येक कर्मचारी जनमित्र यांचा पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन सत्कार करण्यात आला.
‘सुरक्षा विषयक शपथ‘ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली. कार्यक्रमाच्या वेळी विरंगुळा म्हणून नारायण चाटे संगीत रजनी प्रस्तुत यांच्यावतीने गीत गायन मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात जनमित्र श्री सुनील दहिफळे, अर्जुन राव मुंडे, अशोक मुंडे इतर कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण श्री संदीप चाटे सर यांनी केले आपल्या भाषणात महावितरणाची कर्तव्यरूपी सेवा करत असताना येथे चुकीला माफी नाही त्यामुळे काळजीपूर्वक आपण लाईट संदर्भात काम करणे आवश्यक आहे, तसेच काळजी घेणे फार आवश्यक आहे, जनमित्र हा महावितरण चा कणा आहे त्यामुळे तुमच्यावर फार मोठी जिम्मेदारी ती तुम्ही काळजीपूर्वक पार पाडणे आवश्यक आहे याचे भान आपण ठेवले पाहिजे.जणमित्र यांनी विद्युत वाहिनीवर काम करताना एकदा आपल्या कुटुंबाची आठवण काढूनच काम करावे म्हणजे आपण काळजीपूर्वक काम कराल अशी अपेक्षा चाटे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर फड यांनी केले तर आभार लेखा विभाग अधिकारी काळे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अधिकारी सर्वश्री बोबडे सर, कानडे सर, गीते सर, काळे सर, जाधव सर ,कराड सर, श्री डेंगे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कार्यक्रमाला महिला कर्मचारी वर्गाची उपस्थिती आवर्जून होती.