बीड

भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख यांची नियुक्ती..

बीड प्रतिनिधी: -भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी असणारे शंकर देशमुख यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चार महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठीनी त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास दाखवला आहे.

भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभरातील बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड यासंह काही ठिकाणच्या जिल्हाध्यक्षाची निवड प्रलंबित होती.

बीड जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आ चैनसूख संचेती यांनी शनिवारी पक्ष कार्यालयामार्फत उर्वरित जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती जाहिर केली. ज्यामध्ये बीड जिल्हाध्यक्ष पदावर शंकर देशमुख यांची नियुक्ती कायम केली आहे.

देशमुख यांच्या नियुक्ती बद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!