नगरपालिकेसाठी असणार दोन सदस्सीय प्रभाग..
बीड प्रतिनिधी ;– स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भाने आता नगरपालिकांच्या बाबतीत प्रभाग रचना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्यशासनाने जरी केल्या आहेत. त्यानुसार राज्यात नगरपालिकांची दोन सदस्सीय प्रभाग असणार असून २०११ च्या जनगणनेच्या आधारावर लोकसंख्या विचारात घ्यायची असल्याने प्रत्येक नगरपालिकेत आता २०१७ प्रमाणेच सदस्यसंस्ख्या असेल असे अपॆहसीत आहे. रहात सदस्य संख्येसंदर्भाने विभागीय आयुक्त वेगळे आदेर्श काढणार आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तातडीने घेण्यासंदर्भाने आता हालचाली सुरु असून राज्याच्या नगरविकास विभागाने आता प्रभाग रचनेच्या संदर्भाने सविस्तर आदेश काढले आहेत. यात पप्रभाग रचनेसाठी २०११ चीच जनगणना विचारात घेतली जाणार आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूपाला मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार असून त्यानंतर पुढील कार्यक्रम होणार आहेत.
दोन सदस्यांचा एक प्रभाग
मध्यन्तरी चार सदस्सीय प्रभागाची संकल्पना मांडण्यात आली होती, मात्र नगरविकास विभागाच्या ताज्या सूचनांनुसार प्रत्येक प्रभाग दोन सदस्यांचा असणार आहे. ज्या ठिकाणी निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या विषम असेल तेथे एखादा प्रभाग ३ सदस्यांचा असेल.