दिव्यांग, ज्येष्ठांना खा.बजरंग सोनवणेंमुळे मिळणार ‘आधार’
जिल्ह्यात १८ जुलैपासून कृत्रिम साहित्याचे वाटप, पंचायत समिती स्तरावर शिबीरांचे आयोजन
बीड प्रतिनिधी:–
दिव्यांग बांधवांना सहानुभूती नव्हे, तर भक्कम साथ देऊया!, या उदात्त दृष्टीकोनातून खा.बजरंग सोनवणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण बीड लोकसभा मतदार संघामध्ये दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य/साधने वाटप करण्यात येणार आहे. दि.१८ जुलैपासून हे शिबीर पंचायत समिती स्तरावर राबविण्यात येत आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये भव्य पूर्व तपासणी व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव, विविध सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’ अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणे प्रदान करणे हा आहे. एलिम्को, मुंबई या केंद्र शासनाच्या अधिकृत संस्थेच्या माध्यमातून, १८ जुलै ते ३० जुलै २०२५ या कालावधीत बीड लोकसभा मतदार संघात ही विशेष शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये पात्र लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यकतेनुसार तात्काळ मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप केले जाईल. हा उपक्रम दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर होण्यास आणि दैनंदिन जीवन सुलभ करण्यास मदत मिळेल.
०००
बीड लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांपर्यंत गावचे प्रमूख म्हणून सरपंच आणि गावातील तरूणांनी ही माहिती द्यावी, जेणे करून त्यांना या शिबीराचा लाभ होईल.
-खा.बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदारसंघ
००
बीडीओ असतील नोडल अधिकारी
पुर्व तपासणी शिबीरासाठी संबंधीत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिव्यांग नोडल अधिकारी म्हणुन काम करावयाचे आहे. सदर पूर्व तपासणी शिबीरासाठी बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचारी यांना दिव्यांग दूत म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. मुख्याध्यापक यांच्या नियंत्रणाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे दिव्यांग दूत म्हणून काम करतील.
००
तालुकानिहाय दिव्यांग दूत शाळा-
केज: मतिमंद निवासी विद्यालय, उमरी मुकबधीर निवासी विद्यालय, उमरी अस्थिव्यंग निवासी विद्यालय, केज.
अंबाजोगाई: ज्ञानवर्धिनी मूकबधीर निवासी विद्यालय, अंबाजोगाई योधवधिनी मतिमंद निवासी विद्यालय, अंबाजोगाई अहिल्यादेवी मुकबधीर निवासी विद्यालय, अंबाजोगाई ज्ञानसागर कर्णबधीर निवासी विद्यालय, जवळगाव सेवा मतिमंद कार्यशाळा, धानोरा.
बीड: आर्युमर्गलम निवासी मुकबधीर विद्यालय, बीड प्रज्ञाचक्षु निवासी अंध विद्यालय, बीड रुख्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय, पांगरी रोड बीड मतिमंद निवासी विद्यालय, वासनवाडी अनिवासी मुकबधीर विद्यालय, वासनवाडी.
माजलगांव: मतिमंद निवासी विद्यालय, माजलगांव मुकबधीर निवासी विद्यालय, माजलगांव मतिमंद निवासी विद्यालय, किट्टीआडगाव मुकबधीर नियासी विद्यालय, किट्टीआडगाव.
पाटोदा: मुकबधीर निवासी विद्यालय, तांबाराजुरी मतिमंद निवासी विद्यालय, तांबाराजूरी, मतिमंद निवासी विद्यालय, दासखेड.
वडवणी: साईनाथ मतिमंद निवासी विद्यालय, नाथापुर मतिमंद निवासी विद्यालय, संभाजी नगर बीड अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनुर मुकबधीर निवासी विद्यालय, नेकनूर.
आष्टी: छत्रपती शाहू महाराज मुकबधीर निवासी विद्यालय, आष्टी छत्रपती शाहू महाराज अस्थिव्यंग निवासी विद्यालय, आष्टी श्रेया मतिमंद निवासी विद्यालय, कारखेल,
धारूर: मतिमंद निवासी विद्यालय धारुर अस्थिव्यंग निवासी विद्यालय, धारुर मुकबधीर निवासी विद्यालय, धारुर मतिमंद निवासी विद्यालय, बीड रोड धारुर.
परळी: मानवविकास मुकबधीर निवासी विद्यालय, अंबाजोगाई मानवविकास मतिमंद निवासी विद्यालय, अंबाजोगाई मानवविकास अस्थिव्यंग निवासी विद्यालय, अंबाजोगाई मुकबधीर निवासी विद्यालय, परळी कर्तव्य मतिमंद निवासी विद्यालय, अंबाजोगाई मतिमंद निवासी विद्यालय, शिरुर: मतिमंद निवासी विद्यालय शिरूर, अस्थिव्यंग निवासी विद्यालय तळेगाव, ता.बीड.
गेवराई: अस्थिव्यंग निवासी विद्यालय, तळेगाव ता. जि.बीड के.केशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय, तलवाडा ता.गेवराई मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई प्रौढ मतिमंद निवासी कार्यशाळा, तलवाडा
००
शिबीर कधी व कोठे?
तालुका दिनांक ठिकाण
केज १८ जुलै पंचायत समिती
अंबाजोगाई १९ जुलै पंचायत समिती
बीड २१ जुलै पंचायत समिती
माजलगाव २२ जुलै पंचायत समिती
पाटोदा २३ जुलै पंचायत समिती
वडवणी २४ जुलै पंचायत समिती
आष्टी २५ जुलै पंचायत समिती
धारूर २६ जुलै पंचायत समिती
परळी २८ जुलै पंचायत समिती
शिरूर २९ जुलै पंचायत समिती
गेवराई ३०जुलै पंचायत समिती