बीड प्रतिनिधी:
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका कंटेनरने सहा जणांना चिरडले असून यातील चौघांचा जागीच मृत्यु झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.३०)रोजी सकाळी घडली आहे.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या पेंडगाव येथे हे सहा जण दर्शनासाठी जात असताना काळाने झडप घातली असून, या भीषण अपघातात चौघांचा शनिवार (दि.३०)रोजी जागीच मृत्यु झाला आहे. जखमींना तातडीने बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण हा अपघात नेमक कसा घडला, यातील मयत, जखमी यांची नावं व गाव समजू शकली नाहीत.